Bollywood Nostalgia Kissa : बॉलिवूडमध्ये असे अनेक चित्रपट आले ज्यांनी मनोरंजन विश्वात चांगलाच धुमाकूळ घातला होता. यात काम करणारे कलाकार त्यांच्या अभिनयामुळे तर चर्चेत राहिलेच, पण वैयक्तिक आयुष्यामुळेही काही कलाकार प्रसिद्धी झोतात आले. असाच एक अभिनेता बॉलिवूडमध्ये आला, ज्याने आपल्या हँडसम लूकने सगळ्यांची मने जिंकली. काही चित्रपटात या अभिनेत्याने व्हिलन देखील साकारला. नुकतीच अभिनेत्याने वयाच्या ७०व्या वर्षी स्वतःपेक्षा तब्बल ३० वर्षांनी लहान असलेल्या महिलेशी लग्न करून खळबळ उडवून दिली होती. तुम्ही ओळखलं का अभिनेत्याचं नाव?
या अभिनेत्याचं नाव आहे कबीर बेदी. अभिनेते कबीर बेदी यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. ते त्यांच्या प्रेमप्रकरणामुळेही नेहमीच चर्चेत राहिले आहेत. त्यांनी वयाच्या ७०व्या वर्षी चौथ्यांदा लग्न करून सगळ्यांनाच आश्चर्यचकित केले. कबीर बेदी यांनी त्यांच्या कारकिर्दीत बहुतांश नकारात्मक भूमिका केल्या आहेत. १९८८मध्ये प्रदर्शित झालेल्या राकेश रोशन दिग्दर्शित 'खून भरी मांग' या चित्रपटातही त्यांनी नकारात्मक भूमिका साकारली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली होती. अवघ्या दीड कोटी रुपये खर्चून बनलेल्या या चित्रपटाने जवळपास ६ कोटींची कमाई केली होती. रेखा, कबीर बेदी आणि शत्रुघ्न सिन्हा अभिनीत हा चित्रपट १९८८ साली सर्वाधिक कमाई करणारा पाचवा चित्रपट ठरला होता.
या चित्रपटात त्यांना कशी भूमिका मिळाली याचा किस्सा त्यांनी स्वतः शेअर केला होता. त्यांना एका फोन कॉलवर या चित्रपटातील भूमिका ऑफर करण्यात आली होती. चित्रपटाची स्क्रिप्टही न वाचता कबीर बेदी यांनी चित्रपटाला होकार दिला होता. यामागचे कारण होते अभिनेत्री रेखा. कबीर बेदी यांनी रेखा यांचे नाव ऐकताच लगेच चित्रपटाला होकार दिला. रेखा या त्यावेळी बॉलिवूडवर अक्षरश: राज्य करत होत्या. रेखाचं नाव ऐकताच कबीर बेदी यांनी क्षणाचाही विचार न करता, स्क्रिप्ट न वाचता लगेच होकार देऊन टाकला होता.
कबीर बेदी हे आपल्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे इंडस्ट्रीत जास्त चर्चेत राहिले. त्या काळातही त्यांचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले होते. त्यांची लव्ह लाईफ नेहमीच चर्चेत राहिली होती. पण, अभिनेत्याने जेव्हा वयाच्या ७०व्या वर्षी त्यांनी चौथ्यांदा त्यांच्यापेक्षा ३० वर्षांनी लहान असलेल्या मैत्रिणीशी लग्न केले. त्यांच्या या लग्नाचीही खूप चर्चा झाली होती.
संबंधित बातम्या