मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bollywood Nostalgia: प्रसिद्ध ‘रामायण’ मालिकेतील कलाकारांना किती मानधन मिळाले होते माहितीये का? वाचा...

Bollywood Nostalgia: प्रसिद्ध ‘रामायण’ मालिकेतील कलाकारांना किती मानधन मिळाले होते माहितीये का? वाचा...

Harshada Bhirvandekar HT Marathi
Mar 13, 2024 02:09 PM IST

Bollywood Nostalgia Ramayana Cast Fees: तुम्हाला माहिती आहे का की, ‘रामायण’ या मालिकेत काम करणाऱ्या प्रत्येक अभिनेत्याला किती मानधन मिळाले होते?

Ramayana Cast Fees
Ramayana Cast Fees

Bollywood Nostalgia Ramayana Cast Fees: रामानंद सागर यांची ‘रामायण’ ही मालिका टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय पौराणिक मालिकांपैकी एक आहे. आजही या मालिकेचे लोकांच्या मनात एक खास स्थान आहे. अभिनेते अरुण गोविल आणि अभिनेत्री दीपिका चिखलिया हे कलाकार या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकले होते. ‘रामायण’ मालिकेमधील या कलाकारांना प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळाले होते. आजही चाहते या कलाकारांची देवाप्रमाणे पूजा करतात. लॉकडाऊन दरम्यान टीव्हीवर पुन्हा एकदा ‘रामायण’ ही मालिका प्रसारित करण्यात आली होती. अगदी २० वर्षांनंतर देखील या मालिकेवर चाहत्यांनी मनापासून प्रेमाचा वर्षाव केला. या दरम्यान ‘रामायणा’च्या एका एपिसोडने विश्वविक्रम केला होता. या मालिकेतील कलाकारांना त्याकाळी देखील तगडे मानधन मिळाले होते.

‘रामायण’ मालिकेतील लक्ष्मण आणि मेघनाथ यांच्यातील युद्ध दाखवण्यात आलेल्या एपिसोडला सर्वाधिक व्ह्यूज मिळाले होते. या एपिसोडने इतिहास रचला होता. हा एपिसोड तब्बल ७.७ कोटींहून अधिक लोकांनी पाहिला होता. तुम्हाला माहिती आहे का की, या मालिकेत काम करणाऱ्या प्रत्येक अभिनेत्याला किती मानधन मिळाले होते?

Viral Video: विमानतळावर पतीसोबत लिपलॉक करताना दिसली ‘काँटा लगा गर्ल’; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणतायत...

रामायणातील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता कोण?

‘रामायण’ या मालिकेमध्ये अभिनेते अरुण गोविल यांनी भगवान रामाची भूमिका साकारली होती. अरुण गोविल हे या शोचे सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते होते. मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेते अरुण गोविल यांनी संपूर्ण शोसाठी ४० लाख रुपये मानधन घेतले होते. मात्र, या शोमध्ये सीता मातेची भूमिका साकारणारी अभिनेत्री दीपिका चिखलिया हिला अरुण गोविल यांच्या निम्मे मानधन मिळाले होते. अभिनेत्री दीपिका चिखलियाला या मालिकेसाठी २० लाख रुपये फी मिळाली होती. या मालिकेमध्ये हनुमान आणि रावणाची भूमिका साकारणाऱ्या कलाकारांपेक्षाही दीपिका चिखलियाचे मानधन कमी होते.

‘लक्ष्मण’ सुनील लाहिरी यांना किती फी मिळाली?

‘रामायण’ या मालिकेमध्ये अभिनेते सुनील लाहिरी यांनी ‘लक्ष्मणा’ची भूमिका साकारली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुनील लाहिरी यांना या भूमिकेसाठी २५ लाख रुपये मानधन मिळाले होते. तर, ‘रामायण’मध्ये ‘हनुमाना’ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेते दारा सिंह यांना ३५ लाख रुपये आणि ‘रावण’ फेम अभिनेते अरविंद त्रिवेदी यांना ३० लाख रुपये फी मिळाली होती. या तिन्ही कलाकारांनी दीपिकापेक्षा जास्त पैसे मिळाले होते.

‘रामायणा’च्या एका एपिसोडसाठी किती खर्च व्हायचा?

रामानंद सागर यांची ‘रामायण’ ही मालिका पहिल्यांदा २५ जानेवारी १९८७ रोजी प्रसारित झाली होती. त्यावेळी ‘रामायण’ मालिकेचा एक भाग बनवण्यासाठी तब्बल ९ लाख रुपये खर्च आला होता. तर, या शोच्या एका एपिसोडमधून तब्बल ४० लाख रुपयांची कमाई झाल्याचे म्हटले जाते.

IPL_Entry_Point