Bollywood Nostalgia : २००८मध्ये ‘या’ चित्रपटाने केली होती सर्वाधिक कमाई! फाईट करताना बिघडली होती हिरोची तब्येत
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bollywood Nostalgia : २००८मध्ये ‘या’ चित्रपटाने केली होती सर्वाधिक कमाई! फाईट करताना बिघडली होती हिरोची तब्येत

Bollywood Nostalgia : २००८मध्ये ‘या’ चित्रपटाने केली होती सर्वाधिक कमाई! फाईट करताना बिघडली होती हिरोची तब्येत

Nov 20, 2024 08:23 PM IST

Bollywood Nostalgia : २००८ साली आमिर खानचा एक थ्रिलर चित्रपट रिलीज झाला होता. हा चित्रपट त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता.

२००८मध्ये ‘या’ चित्रपटाने केली होती सर्वाधिक कमाई!
२००८मध्ये ‘या’ चित्रपटाने केली होती सर्वाधिक कमाई!

Bollywood Nostalgia Movie : बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा अॅक्शन थ्रिलर चित्रपट २००८ मध्ये सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. या चित्रपटातील आमिर खानचा अभिनय प्रेक्षकांना चांगलाच भावला होता. हा चित्रपट एका गाजलेल्या साऊथच्या चित्रपटाचा रिमेक होता. या चित्रपटात आमिर खानसोबत दाक्षिणात्य अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसली होती. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान आमिर खानची तब्येत बिघडल्याने चित्रपटाचे चित्रीकरण दोन महिने थांबवावे लागले होते. एका फाईट सीनदरम्यान आमिर खानची तब्येत खूप बिघडली होती.

आमिर खानच्या चित्रपटाचे नाव काय होते?

आम्ही इतकं वर्णन केल्या नंतर तुम्ही आमिर खानच्या या चित्रपटाचं नाव ओळखलंत का? नसेल तर आम्हीच तुम्हाला चित्रपटाचं नाव सांगणार आहोत. ‘गजनी’ असं या चित्रपटाचं नाव होतं. या चित्रपटात आमिर खानसोबत असिन दिसली होती. आमिर खानचा ‘गजनी’ हा तमिळ चित्रपट ‘गजनी’चा रिमेक होता. दाक्षिणात्य अभिनेता सूर्या गजनी या तामिळ चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसला होता. ‘गजनी’ या तामिळ चित्रपटातही असिन मुख्य भूमिकेत होती. 

Kangana Ranaut : नेपोटीझमचा मुद्दा उचलून भांडणाऱ्या कंगना रणौतनं केलं शाहरुख खानच्या लेकाचं कौतुक! म्हणाली...

केली होती सर्वाधिक कमाई

आमिर खानच्या ‘गजनी’च्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाने जवळपास २३२ कोटींची कमाई केली होती. प्रदीप रावत यांनी या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली होती. त्यांनी एका जुन्या मुलाखतीत सांगितले होते की, चित्रपटातील फायटिंग सीन शूट करताना आमिर खानची तब्येत बिघडली होती, त्यानंतर चित्रपटाचे शूटिंग दोन महिने थांबवावे लागले होते. 

नेमकं काय झालं होतं? 

प्रदीप यांनी हा किस्सा सांगताना म्हटले होते की, या चित्रपटात एक सीन असा होता ज्यात आमिर खानच्या व्यक्तिरेखेला खलनायक उचलून भिंतीवर आपटतो. हा फाईट सीक्वेंस करताना यामध्ये खूप धावपळ झाली होती. या सीनमध्ये सतत धावल्यामुळे डिहायड्रेशन झाल्यामुळे आमिरला चक्कर आली होती. यानंतर आमिर खानला स्ट्रेचरवर नेण्यात आले. आमिर खानच्या आजारपणामुळे या चित्रपटाचे चित्रीकरण दोन महिने थांबवावे लागले होते. त्याची तब्येत सुधारल्यानंतर पुन्हा एकदा चित्रपट सुरू झाला होता.  

Whats_app_banner