Bollywood Nostalgia: अलका याज्ञिक यांना एआर रहमानसोबत करायचं नव्हतं काम! नेमकं काय झालं होतं?-bollywood nostalgia alka yagnik did not want to work with ar rahman what exactly happened ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bollywood Nostalgia: अलका याज्ञिक यांना एआर रहमानसोबत करायचं नव्हतं काम! नेमकं काय झालं होतं?

Bollywood Nostalgia: अलका याज्ञिक यांना एआर रहमानसोबत करायचं नव्हतं काम! नेमकं काय झालं होतं?

Aug 17, 2024 09:37 AM IST

Bollywood Nostalgia: १६ ऑगस्ट रोजी ७वा राष्ट्रीय पुरस्कार जिंकलेल्या एआर रहमानसोबत काम करण्यास एकदा अलका याज्ञिक यांनी नकार दिला होता.

अलका याज्ञिक-एआर रहमान
अलका याज्ञिक-एआर रहमान

Bollywood Nostalgia: बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट संगीतकार एआर रहमान यांना १६ ऑगस्ट रोजी सातवा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. एआर रहमान यांची गाणी प्रत्येकाच्या जिभेवर रेंगाळत असतात.  एआर रहमान यांची गाणी ऐकली नाहीत, असे क्वचितच कुणी असेल. आज एआर रहमान हे इंडस्ट्रीतलं मोठं नाव आहे. पण, एआर रेहमानच्या आयुष्यात एक काळ असा होता, जेव्हा बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिका अलका याज्ञिक आणि गायक कुमार सानू यांनी एआर रहमानसोबत काम करण्यास नकार दिला होता. खुद्द गायिका अलका याज्ञिक यांनी याचा खुलासा केला आहे.

'रेडिओ नशा'शी खास संवाद साधताना अलका याज्ञिक यांनी त्या काळची एक आठवण सांगितली, जेव्हा एआर रहमान पहिल्यांदा त्यांच्याकडे कामासाठी आले होते. अलका याज्ञिक म्हणाल्या, ‘त्यावेळी एआर रहमान हे नवे नाव होते. विशेषतः मुंबईत त्यांना कोणीही ओळखत नव्हते. दक्षिणेत एआर रहमान यांना सर्वजण ओळखत होते. त्यावेळी ते खूप तरुण होते. मला चेन्नईहून फोन आला की, एआर रहमान नवीन संगीतकार आहे. तो तुझा खूप मोठा चाहता आहे. तो एका चित्रपटासाठी गाणी बनवत आहे. मीआणि कुमार सानूने चित्रपटासाठी गावे अशी त्याची इच्छा आहे. पण प्रॉब्लेम असा होता की, ते लगेच बोलवण्यासाठी मला फोन करत होते. पण, माझ्या तारखा आधीच बुक होत्या. तसेच मुंबईत मी इतक्या संगीतकारांसोबत काम केले आणि माझा रेपो बनवला होता की, मला त्यांना सोडायचे नव्हते. तसेच त्यावेळी मला एआर रहमान कोण हे माहित नव्हते. मला त्यांची क्षमता माहित नव्हती.’ 

Alka Yagnik Birthday: वयाच्या अवघ्या ६व्या वर्षी अलका याज्ञिक यांनी केली होती करिअरची सुरुवात!

कुमार सानू यांनी ही दिला होता नकार!

त्यानंतर अलका यांनी कुमार सानू यांना फोन केल्याचे सांगितले. त्यांच्याशी चर्चा केली असता त्यांनाही चेन्नईहून फोन आल्याचे समजले. कुमार सानू यांनी अलका याज्ञिक यांना सांगितले की, त्यांनी चेन्नईला जाण्यास नकार दिला आहे. त्यांच्या तारखा बुक झाल्याचे देखील त्यांनी सांगितले. यानंतर अलका याज्ञिक यांनीही चेन्नईला जाण्यास नकार दिला.  

संभाषणादरम्यान अलका याज्ञिक म्हणाल्या की, ‘नंतर जेव्हा मी त्यांची गाणी ऐकली तेव्हा मला भिंतीवर डोके आपटून घ्यावे वाटत होते. ती गाणी किती सुंदर होती.’ यानंतर अलका याज्ञिक यांनी एआर रहमान यांच्यासोबतच्या पहिल्या कामाची आठवण सांगितली. एआर रेहमान अलका यांना भेटताच म्हणाले की, तुम्ही माझी जुनी गाणी गायली नाहीत. यावर अलका याज्ञिक म्हणाल्या की, ‘मला माझीच खूप लाज वाटली. मला स्वत:ला कुठेतरी गुडूप व्हावं वाटत होतं. तो पूर्णपणे माझा तोटा होता.’