ऐश्वर्या राय बनली होती अमिताभ बच्चन यांची बहीण; प्रेक्षकांनीही नाकारलेला 'हा' चित्रपट! तुम्ही पाहिलात का?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  ऐश्वर्या राय बनली होती अमिताभ बच्चन यांची बहीण; प्रेक्षकांनीही नाकारलेला 'हा' चित्रपट! तुम्ही पाहिलात का?

ऐश्वर्या राय बनली होती अमिताभ बच्चन यांची बहीण; प्रेक्षकांनीही नाकारलेला 'हा' चित्रपट! तुम्ही पाहिलात का?

Jan 11, 2025 08:00 AM IST

Bollywood Nostalgia : तुम्हाला अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचा एक चित्रपट आठवतो का, ज्यामध्ये अभिनेत्रीने बिग बींच्या बहिणीची भूमिका साकारली होती.

ऐश्वर्या राय बनली होती अमिताभ बच्चन यांची बहीण; प्रेक्षकांनीही नाकारलेला 'हा' चित्रपट! तुम्ही पाहिलात का?
ऐश्वर्या राय बनली होती अमिताभ बच्चन यांची बहीण; प्रेक्षकांनीही नाकारलेला 'हा' चित्रपट! तुम्ही पाहिलात का?

Bollywood Nostalgia : 'शोले', 'झहीर', 'डॉन', 'बागबान', 'कभी खुशी कभी गम' असे अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट देणाऱ्या अमिताभ बच्चन यांच्या करिअरची सुरुवात एका फ्लॉप चित्रपटाने झाली होती. 'सात हिंदुस्तानी' या चित्रपटातून त्यांनी आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. एकापाठोपाठ फ्लॉप चित्रपट देणारा हा अभिनेता एके दिवशी बॉलिवूडचा मेगास्टार होईल, असा विचार कुणी केलाही नसेल. अमिताभ बच्चन यांनी पत्नी जया बच्चन, मुलगा अभिषेक बच्चन आणि सून ऐश्वर्या राय बच्चन यांच्यासोबतही चित्रपट केले आहेत, जे लोकांना खूप आवडले. पण, तुम्हाला अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचा एक चित्रपट आठवतो का, ज्यामध्ये अभिनेत्रीने बिग बींच्या बहिणीची भूमिका साकारली होती.

अमिताभ बच्चन यांनी आपल्या अभिनयाने नेहमीच लोकांचे भरपूर मनोरंजन केले. २३ वर्षांपूर्वी ते ऐश्वर्या राय, संजय दत्त आणि अजय देवगण यांसारख्या स्टार्ससोबत एका चित्रपटात झळकले होते. चाहत्यांना वाटले होते की, हा मल्टीस्टारर चित्रपट पडद्यावर काहीतरी जादू दाखवेल. पण, हा चित्रपट पाहून प्रेक्षकांनी अक्षरश: कपाळावर हात मारून घेतला.

बॉक्स ऑफिसवर सपाटून आपटला चित्रपट!

२ तास ४१ मिनिटांच्या या चित्रपटाचे नाव 'हम किसी से कम नहीं' असे आहे. या चित्रपटाची कथा गुंड 'मुन्ना भाई' (संजय दत्त), 'कोमल' (ऐश्वर्या राय), कोमलचा भाऊ 'डॉक्टर रस्तोगी' (अमिताभ बच्चन) आणि प्रियकर 'राजा' (अजय देवगण) यांच्याभोवती फिरते. हा चित्रपट लोकांना अजिबात आकर्षित करू शकला नाही आणि बॉक्स ऑफिसवर सपाटून आपटला. प्रेक्षकांनी या चित्रपटाची कथा पूर्णपणे नाकारली आणि तो सुपर फ्लॉप ठरला.

Nivedita Saraf: निवेदिता-अशोक सराफ यांच्या लग्नाला होता कुटुंबियांचा विरोध! कशी जुळली रेशीमगाठ ? वाचा...

करिश्मा कपूर होती पहिली पसंती

या चित्रपटासाठी निर्मात्यांची पहिली पसंती करिश्मा कपूर होती. निर्मात्यांनीही तिच्याशी संपर्क देखील साधला होता. मात्र, तिने त्यात रस दाखवला नाही. डेव्हिड धवनच्या आधी हा चित्रपट बनवण्याची जबाबदारी महेश मांजरेकर यांच्याकडे होती, मात्र त्यांनी नकार दिल्यानंतर डेव्हिड धवनने दिग्दर्शनाची जबाबदारी स्वीकारली. या चित्रपटाला आयएमडीबीवर १० पैकी ४.२चे रेटिंग मिळाले आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओवर उपलब्ध आहे.

काय आहे चित्रपटाची कथा?

गँगस्टर मुन्ना भाई कोमलच्या प्रेमात पडतो. पण, कोमल राजाच्या प्रेमात आहे. कोमलला एक भाऊही आहे, डॉ. रस्तोगी. आता एकीकडे मुन्नाभाईला कोमलच्या भावाला कोमलशी लग्न करायला पटवायचे आहे आणि दुसरीकडे त्याला राजाचे पत्ता साफ करायचा आहे. चित्रपटाची संपूर्ण कथा याच भोवती फिरते. पण, यातला मुन्नाभाईचा हा संघर्ष प्रेक्षकांना अजिबात आवडला नाही आणि चित्रपट प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची अवस्था खूप वाईट झाली होती.

Whats_app_banner