माधुरीसोबत एक सीन करायला प्रचंड कचरत होता आमिर खान! काय होता तो सीन? वाचा किस्सा
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  माधुरीसोबत एक सीन करायला प्रचंड कचरत होता आमिर खान! काय होता तो सीन? वाचा किस्सा

माधुरीसोबत एक सीन करायला प्रचंड कचरत होता आमिर खान! काय होता तो सीन? वाचा किस्सा

Jan 09, 2025 03:42 PM IST

Bollywood Nostalgia : आमिर खान आणि माधुरी दीक्षित यांचा ‘दिल’ हा चित्रपट त्या वेळचा हिट चित्रपट होता. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने चांगली कमाई केली होती.

माधुरीसोबत एक सीन करायला प्रचंड कचरत होता आमिर खान! काय होता तो सीन? वाचा किस्सा
माधुरीसोबत एक सीन करायला प्रचंड कचरत होता आमिर खान! काय होता तो सीन? वाचा किस्सा

Aamir Khan-Madhuri Dixit Film Dil : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्टनिस्ट अर्थात अभिनेता आमिर खान आणि ‘धकधक गर्ल’ अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्या हिट चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘दिल’. या गाजलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शन इंद्रकुमार यांनी केले होते. इंद्रकुमार आणि आमिर यांनी अनेक बॉलिवूड चित्रपट एकत्र केले आहेत. नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी आमिरसोबत काम करण्याचा अनुभवही सांगितला.  ‘दिल’ या चित्रपटात माधुरीसोबत काम करताना एका सीनमध्ये लाकूड फोडण्याचे काम करून लग्न करण्यास आमिर खान तयार नव्हता, याचा किस्सा त्यांनी शेअर केला आहे.

काय होता तो सीन?

इंद्रकुमार म्हणाले की, ‘लाकूड तोडून लग्न करण्याचा सीन आमिरला सुरुवातीला आवडला नाही. आमिर खान त्यांना म्हणाला की,  ‘इंद्रा, तू वेडा झाला आहेस का? स्टूल तोडून कुणी लग्न करतं का? आमिर आणि इंद्रकुमार या दोघांमध्ये मतभेद होण्याची ही पहिली वेळ होती. इंद्रकुमार म्हणाले की, ‘सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत आम्ही त्या दृश्यावर चर्चा करत राहिलो होतो. प्रेक्षकांना हा सीन आवडेल असा मी अंदाज बांधत होतो. मी बरोबर होतो, असं मी आमिरला सतत सांगत होतो. पण, ’दिल’ हा चित्रपट चालेल यावर मला शंका येत होती. पण, तसं झालं नाही. ‘दिल’ चित्रपटाची कथा, दोन्ही कलाकारांची केमिस्ट्री आणि त्यातील गाणी प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. या चित्रपटात रोमान्स आणि फॅमिली ड्रामा भरभरून होता.

आमिरने नकार दिलेल्या 'या' सिनेमाने संजयला बनवले रातोरात स्टार, १९९१मध्ये केली होती सर्वाधिक कमाई

आमिरला वाटलं की 'मन' चालणार नाही!

इंद्र आणि आमिर या जोडीबद्दल बोलायचे तर, त्यांनी ‘मन’ चित्रपटातही एकत्र काम केलं आहे. पण, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नाही. सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत इंद्राने कबूल केले की, त्याचे चित्रपटावरील नियंत्रण सुटले होते आणि आमिरने निर्मितीदरम्यान याबद्दल त्याला अंदाज दिला होता. ‘मन’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरल्यानंतर आमिर खान इंद्रकुमारला म्हणाला होता की, ‘मी तुला हे आधीच सांगितलं होतं.’

 

आमिर खानच्या प्रोफेशनल लाईफबद्दल बोलायचे झाले, तर तो शेवट २०१८मध्ये ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत करीना कपूर खान मुख्य भूमिकेत होती. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. त्यानंतर आमिर खानने एकही चित्रपट साइन केलेला नाही.

Whats_app_banner