Aamir Khan Bollywood Movie : बॉलिवूडचा ‘मिस्टर पर्फेक्टनिस्ट’ अभिनेता आमिर खान आणि ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित यांचा एक चित्रपट १९९० मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यांचा हा चित्रपट एक म्युझिकल रोमँटिक चित्रपट होता. आमिर खान आणि माधुरी दीक्षित यांचा हा चित्रपट त्या वर्षी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन इंद्रकुमार यांनी केले होते. या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले होते. आज आम्ही तुम्हाला या चित्रपटाच्या कथेबद्दल सांगणार आहोत.
अभिनेता आमिर खान आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्या चित्रपटाचं नाव तुम्ही ओळखलंत का?या चित्रपटाचं नाव होतं ‘दिल’. आमिर खान आणि माधुरी दीक्षित यांचा हा चित्रपट १९९० सालातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. या चित्रपटात माधुरी दीक्षित आणि आमिर खान व्यतिरिक्त देवेन वर्मा, अनुपम खेर, दीपक तिजोरी, जॉनी लिव्हर, राजेश पुरी आणि केतकी दवे यांच्याही भूमिका होत्या. आमिर खान आणि अनुपम खेर यांनी पहिल्यांदाच एकत्र चित्रपट केला होता.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट दोन कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता. तर चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कमाईबद्दल बोलायचे झाले तर, या चित्रपटाने जवळपास २० कोटींची कमाई केली होती. २० कोटींची कमाई करणारा हा चित्रपट त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. या चित्रपटाने प्रेक्षकांची मने देखील जिंकून घेतली होती. आजही हा चित्रपट आवडीने पाहिला जातो.
आमिर खान आणि माधुरी दीक्षित यांच्या ‘दिल’ या चित्रपटाच्या कथानकाबद्दल बोलायचे झाले तर, मधु (माधुरी दीक्षित) आणि राजा (आमिर खान) स्वत:च्या मर्जीने लग्न करतात. यानंतर दोघांच्या ही कुटुंबातील सदस्य दोघांच्या लग्नात अडचणी निर्माण करतात. या दरम्यान त्यांच्या आयुष्यात अनेक घटना घडतात. परंतु, दोघेही यामधून आपल्या प्रेमाच्या नात्याला वाचवण्याचा प्रयत्न करतात. या चित्रपटाच्या संगीताबद्दल बोलायचे झाले तर, ‘दिल’ चित्रपटाचे संगीत आनंद-मिलिंद (आनंद चित्रगुप्त आणि मिलिंद चित्रगुप्त) यांनी दिग्दर्शित केले होते. या चित्रपटाचे आयएमडीबी रेटिंग ६.६ आहे. अॅमेझॉन प्राईम व्हिडिओवर तुम्ही हा चित्रपट आताही पाहू शकता.
संबंधित बातम्या