raid 2 box office collection Day 4 : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि रितेश देशमुख यांच्या 'रेड-२' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपला पहिला वीकेंड पूर्ण केला आहे. चित्रपटाचा पहिला भाग सुपरहिट झाला होता आणि दुसऱ्या भागालाही आयएमडीबीवर ८.१ रेटिंग मिळाले होते. मध्यम बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा होत्या आणि तो त्या पूर्ण झाल्या आहेत. पण कमाईच्या बाबतीत ट्रेड एक्स्पर्ट आणि निर्मात्यांना अपेक्षित असलेला चमत्कार हा चित्रपट करू शकला का? जाणून घेऊया रेड-2 चित्रपटाच्या आतापर्यंतच्या कमाईचे आकडे आणि गर्दी.
पहिला दिवस - १९.२५ कोटी रुपये
दिवस २ - १२ कोटी रुपये (३७.६६%)
दिवस तिसरा - १८ कोटी रुपये (५०.००%)
दिवस चौथा - २१.५० कोटी रुपये
एकूण - ७०.७५ कोटी रुपये
रविवारच्या कमाईनंतर हा चित्रपट इथून १०० कोटी क्लबकडे वाटचाल करताना दिसत आहे. मात्र आठवड्याच्या दिवसात पुन्हा एकदा चित्रपटाच्या कमाईचा वेग मंदावणार असून १०० कोटींचा आकडा गाठण्यासाठी किती वेळ लागेल हे पाहावं लागेल. सायंकाळच्या शोमध्ये हा चित्रपट सर्वाधिक प्रेक्षक वर्ग खेचत आहे. सकाळच्या शोमध्ये १९.३८ टक्के, तर दुपारच्या शोमध्ये ४५.३४ टक्के प्रेक्षकांनी हजेरी लावली आहे. सायंकाळच्या शोमध्ये ५५.०७ टक्के तिकिटे विकली जातात, तर रात्री ३९.४२ टक्के तिकिटे विकली जातात.
चेन्नई, बेंगळुरू, मुंबई, पुणे, अहमदाबाद, जयपूर या शहरांमधून या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. एकूण कमाईच्या बाबतीत रेड-२ ने आतापर्यंत लाइफटाइम कलेक्शनच्या बाबतीत अजय देवगणच्या गोलमाल रिटर्न्स, मैदान, सत्याग्रह, दृश्यम आणि थँक गॉडला मागे टाकले आहे. रेड-२ ची एकूण कमाई किती आहे, हे आपल्याला कालांतराने कळेल.
संबंधित बातम्या