Movies releasing in September: चित्रपट रसिकांसाठी सप्टेंबर महिना खूप खास असणार आहे. कारण या महिन्यात एकापेक्षा एक चित्रपट रिलीज होण्याच्या तयारीत आहेत. एकीकडे गणपती बाप्पा या महिन्यात येणार असल्याने सगळेच आधीच उत्साहात आहेत. त्यात आता मनोरंजनाचा खजिना देखील उघडला जाणार आहे. या महिन्यात अनेक दमदार चित्रपट रिलीज होणार आहेत. या सप्टेंबरमध्ये ॲक्शन, ड्रामा, कॉमेडी आणि रोमान्ससह क्राईम-थ्रिलरचा संपूर्ण डोस मिळणार आहे. कंगना रनौतच्या 'इमर्जन्सी'पासून ते करीना कपूरचा 'द बकिंगहॅम मर्डर्स' आणि 'देवरा-पार्ट १' रिलीजसाठी सज्ज आहेत. चला एक नजर टाकूया या चित्रपटांच्या यादीवर...
GOAT (ग्रेट ऑफ ऑल टाईम) या चित्रपटात थलापती विजय मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय प्रशांत मोहन, प्रभू देवा आणि मीनाक्षी चौधरी सारखे स्टार्स देखील या चित्रपटाचा एक भाग आहेत. या चित्रपटात विजय दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट ५ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
कंगना रनौतचा पीरियड ड्रामा 'इमर्जन्सी' ६ सप्टेंबरला थिएटरमध्ये रिलीज होत आहे. या चित्रपटात १९७५ मधील आणीबाणीचा काळ दाखवण्यात आला आहे. या चित्रपटात कंगना रनौत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे.
करीना कपूर 'द बकिंगहॅम मर्डर्स'मध्ये डिटेक्टिव्ह सार्जंट जसमीत भामराची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट एक मर्डर मिस्ट्री आहे, जो १३ सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
विक्रांत मॅसी आणि दीपक डोबरियाल यांचा क्राइम-थ्रिलर चित्रपट 'सेक्टर ३६' देखील रिलीजसाठी सज्ज आहे. या चित्रपटातून आदित्य निंबाळकर दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. हा चित्रपट १३ सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
अपारशक्ती खुराना आणि इश्वाक सिंह यांचा 'बर्लिन' हा चित्रपटही १३ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. अतुल सभरवाल यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा स्पाय-थ्रिलर झी ५वर प्रसारित होणार आहे.
सिद्धांत चतुर्वेदीचा ॲक्शन-थ्रिलर चित्रपट 'युद्ध'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. आता हा चित्रपट २० सप्टेंबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटात मालविका मोहनन, राघव जुयाल आणि राम कपूर देखील दिसणार आहेत.
वरुण धवनची भाची अंजिनी धवन 'बिन्नी अँड फॅमिली' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. जनरेशन गॅप आणि त्यासंबंधीचे वाद दाखवणारा हा चित्रपट २० सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
'देवारा-पार्ट १' हा या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. ज्युनियर एनटीआर, जान्हवी कपूर आणि सैफ अली खान यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट २७ सप्टेंबर रोजी रिलीज होण्यासाठी सज्ज आहे.