Bollywood Divorce : सैफ, करिश्मा, मलायका नव्हे, बॉलिवूडच्या ‘या’ हँडसम अभिनेत्याचा घटस्फोट ठरला महागडा!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bollywood Divorce : सैफ, करिश्मा, मलायका नव्हे, बॉलिवूडच्या ‘या’ हँडसम अभिनेत्याचा घटस्फोट ठरला महागडा!

Bollywood Divorce : सैफ, करिश्मा, मलायका नव्हे, बॉलिवूडच्या ‘या’ हँडसम अभिनेत्याचा घटस्फोट ठरला महागडा!

Nov 05, 2024 06:32 PM IST

Bollywood Most Expensive Divorce:हिंदी चित्रपटसृष्टीत अवघ्या काही वर्षांत अनेक हाय-प्रोफाइल कलाकारांचे घटस्फोट झाले आहेत. पण, यांच्यात सगळ्यात महागडा घटस्फोट कुणाचा होता? चला जाणून घेऊया...

Bollywood Most Expensive Divorce
Bollywood Most Expensive Divorce

Bollywood Most Expensive Divorce : बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये ब्रेकअप ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. एकामागून एक अनेक नाती संपुष्टात येऊ लागली आहेत. लग्न मोडणे ही अफेअरमधील ब्रेकअपपेक्षा मोठी गोष्ट आहे. मात्र, आजकाल अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या खोट्या बातम्या गॉसिप वर्तुळात जोरदार रंगत आहेत. मात्र, या केवळ अफवा असल्याचे दिसत आहे. मात्र, या दरम्यान बॉलिवूडमधील अनेक कलाकारांची लग्न मोडली आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीत अवघ्या काही वर्षांत अनेक हाय-प्रोफाइल कलाकारांचे घटस्फोट झाले आहेत. या यादीत सैफ अली खान, अमृता सिंहपासून ते अरबाज खान, मलायका अरोरा, करिश्मा कपूर आणि हृतिक रोशन यांचा देखील समावेश आहे. पण, यांच्यात सगळ्यात महागडा घटस्फोट कुणाचा होता? चला जाणून घेऊया...

मलायका अरोरा-अरबाज खान

मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचे नाते १९ वर्षांच्या संसारानंतर संपुष्टात आले होते. १२ डिसेंबर १९९८ रोजी त्यांचे लग्न झाले होते. पण, नंतर असे काही घडले की २०१७मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, घटस्फोटानंतर अरबाजने मलायकाला १० ते १५ कोटी रुपये दिले होते.

सैफ अली खान आणि अमृता सिंह

सैफ अली खान आणि अमृता सिंह यांचे लग्न १९९१मध्ये झाले होते. त्यांचे वैवाहिक नाते १३ वर्षे टिकले आणि २००४मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. एका मुलाखतीत घटस्फोटाबाबत बोलताना सैफने घटस्फोटाच्या बदल्यात अमृताला ५ कोटी रुपये दिल्याचे सांगितले होते. याशिवाय मुले सज्ञान होईपर्यंत दरमहा एक लाख रुपये देऊन, त्यांना घर देखील देण्यात आले.

सुशांतसिंह राजपूतची हत्याच झाली; डॉक्टरांनी रिपोर्ट बदलले! सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडचा खळबळजक दावा

आमिर खान आणि रीना दत्ता

मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणवल्या जाणाऱ्या आमिर खानने रीना दत्तासोबत प्रेमविवाह केला होता. त्यांचे नाते सुरुवातीला चांगले गेले आणि त्यांचे वैवाहिक नाते १६ वर्षे टिकले. दोघांनीही तरुण वयात लग्न केले होते. त्यावेळी आमिरचे वय २१ वर्षे होते, तर रीना फक्त १९ वर्षांची होती. दोघांनीही धर्माच्या बंधनामुळे गुपचूप लग्न केले होते. पण २००२मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आमिर खानने रीनाला पोटगी म्हणून ५० कोटी रुपये दिले होते.

करिश्मा कपूर आणि संजय कपूर

कपूर कुटुंबाची लाडकी लेक करिश्मा कपूरने दिल्लीतील एका बिझनेसमनशी लग्न केले होते. त्यांचे नाते सुरुवातीपासूनच वादात होते. दोघांमधील मतभेदांमुळे त्यांचा घटस्फोट झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लोलोला संजय कपूरकडून घटस्फोटाच्या बदल्यात १४ कोटी रुपये मिळाले होते.

हृतिक रोशन आणि सुझैन खान

बॉलिवूडमधील सर्वात महागड्या घटस्फोटाबद्दल बोलायचे झाले ,तर हृतिक रोशन आणि सुझैन खानचा घटस्फोट हा सर्वात महागडा आहे. हृतिकने घटस्फोटाच्या बदल्यात सुझैनला ३८० कोटी रुपये दिले होते, जे मिळाल्यानंतर ती मालामाल झाली. सुझैनने घटस्फोटानंतर आलिशान घर विकत घेतले होते. मात्र, आता दोघेही त्यांच्या आयुष्यात पुढे गेले आहेत.

Whats_app_banner