Shah Rukh Khan Reacts to John Cena Video: अमेरिकन अभिनेता आणि डब्लूडब्लई स्टार जॉन सीनाचा जीममध्ये गाणं गातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओत जॉन सेना बॉलिवूड स्टार शाहरूख खानचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘दिल तो पागल है’ (१९९७) चित्रपटातील ‘भोली सी सूरत’ हे गाणे गाताना दिसत आहे. जॉन सेनाने हिंदीत गायलेल्या गाण्यावर स्वत: शाहरूख खान मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे.
कुस्तीपटू गुरव सिहराने जिम सेशनदरम्यान जॉन सीनाचा त्याच्यासोबत हिंदीत गाणे गातानाचा व्हिडिओ शेअर केला. यावर शाहरूख खानने प्रतिक्रिया दिली. दोघांचे धन्यवाद, छान, लव्ह यू…मी तुम्हाला माझी लेटेस्ट गाणी पाठवणार आहे आणि मला तुमच्या दोघांकडून (जॉन सीना आणि गुरव सिहरा) पुन्हा एक डुएट सॉन्ग हवे आहे!
व्हायरल व्हिडिओमध्ये गुरवने जॉन सीनाची ओळख 'शाहरुख खानचा खूप मोठा चाहता' म्हणून करून देतो. या व्हिडिओत जॉन सेनाने गाणे शिकण्याचा पूर्ण प्रयत्न करणार असल्याचे आहे. त्यानंतर गुरव पुढे म्हणाला, "हे तुमच्यासाठी आहे, मिस्टर शाहरुख खान. हे एक सुपरहिट गाणे आहे." पुढे गौरव दिल ‘तो पागल है’ चित्रपटातील ‘भोली सी सूरत’ हे गाणे गायला सुरुवात करतो. जॉन सेनादेखील त्याच्या पाठोपाठ गाणं गातोय. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये जिम करताना शाहरूखची गाणी गातोय.
जॉन सीना शाहरुखचा प्रसिद्ध चाहता आहे. गेल्या काही वर्षांत त्याने अभिनेत्याला समर्पित अनेक पोस्ट शेअर केल्या आहेत. २०१७ मध्ये जॉनने एक्सवर शाहरुखबद्दल एक लेख लिहिला होता. शाहरूख खानने हा लेख वाचून प्रतिक्रिया दिली. यावर जॉन सेना म्हणाला की, "वेळ काढून 'बघितल्याबद्दल' धन्यवाद! काश, मी कधीतरी तुला 'भेटू' शकेन."