Shah Rukh Khan : बॉलिवूडचा किंग खान म्हणून अभिनेता शाहरुख खान ओळखला जातो. गेल्या दोन- तीन वर्षांपासून त्याचा प्रत्येक चित्रपट हा सुपरहिट ठरताना दिसत आहे. चित्रपटांसोबतच शाहरुख हा त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. नुकताच शाहरुखने त्याचा ५९वा वाढदिवस साजरा केला आहे. या वाढदिवसानिमित्त शाहरुखने चाहत्यांना एक गूड न्यूज दिली आहे. दिवसाला १०० सिग्रेट ओढणाऱ्या शाहरुखने धूम्रपान सोडल्याचे सांगितले आहे.
शाहरुख खानचा वाढदिवस त्याच्या चाहत्यांसाठी एखाद्या सेलिब्रेशनपेक्षा कमी नाही. शाहरुखच्या वाढदिवसानिमित्त त्याची एक झलक पाहण्यासाठी त्याचे चाहते मन्नतच्या बाहेर उभे राहत असत. मात्र, यावेळी सुरक्षेच्या कारणास्तव मन्नतबाहेर चाहत्यांची गर्दी झाली नाही. एका कार्यक्रमात शाहरुख आपल्या चाहत्यांना भेटला. या कार्यक्रमात त्याने धूम्रपान सोडल्याचे जाहीर केले. ते ऐकून चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे.
शाहरुख खानच्या फॅन पेजने किंग खानचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुख खान आपल्या चाहत्यांना धूम्रपान सोडल्याचं सांगताना दिसत आहे. समोर आलेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये शाहरुख खान म्हणतो, "आणखी एक चांगली गोष्ट म्हणजे, मी आता धूम्रपान करत नाही." शाहरुखने ही घोषणा करताच प्रेक्षक खूश झाले आहेत.
शाहरुखला वाटले होते की धूम्रपान सोडल्यानंतर श्वासोच्छवासाला त्रास होणार नाही. पण तरीही आता त्रास होत आहे. "इंशाअल्लाह, हेही ठीक होईल" असे शाहरुख खान म्हणाला. शाहरुख खानने २०११ मध्ये इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, तो दिवसाला १०० सिगारेट ओढायचा. तो म्हणाला होता की तो जेवायला विसरायचा, पाणी पित नव्हता. पण तो सतत धूम्रपान करत होता.
वाचा: 'दृष्ट लागण्या जोगे सारे' गाण्यातील अभिनेत्रीला खरोखरच लागली दृष्ट? अगदी कमी वयात घेतला जगाचा निरोप
शाहरुख खानच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तो त्याच्या आगामी 'किंग' या चित्रपटावर काम करत आहे. शाहरुखचा किंग हा अॅक्शन थ्रिलर चित्रपट असणार आहे. सुहाना खान आणि अभिषेक बच्चन देखील या चित्रपटात दिसणार आहेत. सुजॉय घोष या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटाची सर्वजण आतुरतेने वाट पाहात. एक वेगळा अनुभव प्रेक्षकांना या सिनेमाच्या माध्यमातून मिळणार असल्याचे समोर आले आहे.