Shreya Ghoshal Higest Paid Singer : बॉलिवूडमधील कलाकार आणि इंडस्ट्रीशी संबंधीत असलेले लोक हे आलिशान आयुष्यासाठी विशेष ओळखले जातात. चाहत्यांमध्ये नेहमीच त्यांचे आकर्षण असते. मग ते कलाकार असो वा गायक, लेखक, दिग्दर्शक असो. सर्वजण प्रत्येक प्रोजेक्टसाठी लाखो रुपये मानधन घेतात. बॉलिवूडमधील एक गायिका अशी आहे जी सर्वाधिक मानधन तर घेतेच पण तिच्या एका गाण्याचा मानधनात आलिशान गाडी नक्की येईल असे ही म्हटले जाते. आता ही गायिका कोण? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. चला जाणून घेऊया...
सर्वाधिक मानधन घेणारी ही गायिका दुसरीतिसरी कोणी नसून श्रेया घोषाल आहे. तिच्या आवाजाचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. श्रेयाचे नाव हे बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या गायिकांमध्ये घेतले जाते. श्रेयाने केवळ आवाजानेच नाही तर सौंदर्याने देखील चाहत्यांची मने जिंकली आहेत.
वाचा: वयाच्या ५०व्या वर्षी सिद्धू मुसेवालाची आई देणार मुलांना जन्म, वडिलांनी केली पोस्ट
श्रेया घोषालने आजवर अनेक गाणी गायली आहेत. तिच्या गाण्यांवर बॉलिवूडमधील सुपरस्टार्स अभिनेत्रींनी देखील डान्स केला आहे. न्यूज १८च्या रिपोर्टनुसार, श्रेया घोषालकडे एकूण १८० ते १८५ कोटी रुपयांच्या आसपास संपत्ती आहे. आपल्या जादूई आवाजाने श्रेयाने अल्पावधीतच स्वत:ला सिद्ध केले आहे. आज प्रत्येक व्यक्ती तिचे गाणे आवडीने ऐकतो.
वाचा: ‘आई कुठे काय करते’मधील अनघा उतरणार राजकारणाच्या रिंगणात?
सध्या तरुणांमध्ये हॉलिवूड गायिका रिहानाची क्रेज पाहायला मिळते. तशीच श्रेया घोषालची देखील क्रेझ आहे. डीएनने दिलेल्या वृत्तानुसार, श्रेया घोषाल भारतीय चलनानुसार रिहानाच्या रेट कॉर्डला टक्कर देते. श्रेया घोषाल एक गाणे गाण्याचे २५ ते ३० लाख रुपये मानधन घेते. काही दिवसांपूर्वी श्रेयाने अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्रीवेडींग कार्यक्रमात देखील गाणे गायले होते. तिच्या गाण्याने पाहुण्यांना थिरकण्यास भाग पाडले होते. या सोहळ्यातील श्रेयाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.
श्रेयाने सा रे ग म प या कार्यक्रमात सहभागी होत करिअरला सुरुवात केली होती. या कार्यक्रमाने श्रेयाला रातोरात स्टार बनवले. दिग्दर्शक संजय लीला भन्साळींना तिचा आवाज आवडला आणि त्यांनी तिला 'देवदास' या सिनेमातील गाणी गाण्याची संधी दिली. या सिनेमाच्या माध्यमातून श्रेयाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या गाण्यांनी श्रेयाला एक वेगळी ओळख मिळाली. त्यानंतर तिने कधीही मागे वळून पाहिले नाही. तिने आजपर्यंत २००हून अधिक गाणी गायली आहेत.