Bollywood Super Flop Movie : साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनचा चित्रपट 'पुष्पा २' गेल्या वर्षी म्हणजेच २०२४मध्ये रिलीज झाला होता, जो अजूनही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहेत. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला टक्कर देण्यासाठी सुपरस्टार राम चरण त्याचा 'गेम चेंजर' चित्रपट घेऊन येत आहे. हा चित्रपट काय चमत्कार दाखवू शकतो, हे येत्या १० जानेवारीला रिलीज होण्याच्या दिवशीच कळेल. पण, आज आम्ही तुम्हाला बॉलिवूड सुपरस्टारच्या त्या चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, जो २०२४ मध्ये गेल्या वर्षी प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट २५० कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता. निर्मात्यांना तसेच चाहत्यांना या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. पण, चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर हा चित्रपट मोठा फ्लॉप ठरला.
भारतीय फुटबॉल प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहीम यांचा जीवनपट आणि त्यांचे फुटबॉलमधील योगदान दाखवणाऱ्या या चित्रपटाचे नाव 'मैदान' होते, ज्याची निर्मिती बोनी कपूर यांनी केली होती. जवळपास २५० कोटींचे बजेट असलेला हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा त्याला प्रेक्षकही मिळाले नाहीत. 'शैतान' आणि त्याआधी गेल्या वर्षी 'दृश्यम 2' सारखे सुपरहिट चित्रपट देणाऱ्या अजय देवगणच्या करिअरमध्ये हा चित्रपट फ्लॉप ठरला, ज्याने त्याच्या स्टारडमला हादरा दिला.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, तब्बल २५० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या अजय देवगण आणि प्रियामणी स्टारर 'मैदान' चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर केवळ ५४ कोटी रुपयांचा व्यवसाय केला, तर जगभरात ७१ कोटी रुपयांची कमाई केली. अजय देवगणचा चित्रपट एकूण बजेटच्या निम्मेही वसूल करू शकला नाही आणि मोठा फ्लॉप ठरला.
चित्रपट समीक्षकांना 'मैदान'ची कथा, दिग्दर्शन किंवा संगीत आवडले नाही असे नाही. पण, चित्रपटाचे दुर्दैव हे की, त्याचे प्रदर्शन सतत पुढे ढकलले गेले. 'मैदान' प्रदर्शित झाला, तेव्हा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नाही. या चित्रपटाला अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळाला नाही. पण, बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरलेल्या या चित्रपटाकडून बोनी कपूर यांना खूप अपेक्षा होत्या. एका मुलाखतीत बोनी म्हणाले होते की, 'मैदान'च्या अपयशामुळे ते खूप निराश झाले होते. हा चित्रपट फ्लॉप झाला, असला तरी त्यांना या चित्रपटाकडून खूप आशा होत्या. एवढेच नाही तर अजय देवगणने 'मैदान'मध्ये आपल्या करिअरमधील सर्वोत्तम परफॉर्मन्स दिल्याचे त्याने म्हटले होते. मात्र, दोघांच्याही आशा फॉल ठरल्या.
संबंधित बातम्या