Tamannaah Bhatia: काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'स्त्री २' या चित्रपटातील आयटम साँगने सर्वांचे लक्ष वेधून घेणारी अभिनेत्री म्हणजे तमन्ना भाटिया. तिने सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. सध्या तमन्ना एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे. कारण तमन्नाची ईडीकडून कसून चौकशी झाली. जवळपास पाच-सहा तास तमन्नाची चौकशी सुरु असल्याचे म्हटले जात आहे.
काही दिवसांपूर्वी तमन्नाला ईडीने समन्स पाठवले होते. त्यानंतर तमन्नाची गुवाहाटी येथील ईडी कार्यालयात कसून चौकशी करण्यात आली. तमन्ना तिच्या आईसोबत ईडी कार्यालयात पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. तिची चौकशी जवळपास पाच ते सहा तास सुरु असल्याचे म्हटले जात आहे. पण तमन्नाला ईडीने नोटीस का पाठवली? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
तमन्नाने फेअर पे नावाच्या अॅपचे प्रमोशन केले आहे. हे अॅप महादेव बेटिंग अॅपशी संबंधीत आहे. या अॅपवर मनोरंजन क्षेत्र, क्रिकेट, पोकर, बॅडमिंटन, कार्ड गेम्स, फुटबॉल या सगळ्यासाठी बेटिंग करता येते. या अॅपचे प्रमोशन केल्यामुळे तमन्नाच्या अडचणीत वाढ झाली आहे. तिची जाहिरात पाहून ईडीने तमन्नाला नोटिस पाठवली आणि चौकशीसाठी गुवाहाटी कार्यालयात बोलावले. FairPlay हे एक बेटिंग अॅप आहे. त्यात अनेक प्रकारचे गेम्स आहेत ज्यावर सट्टा लावता येतो.
वाचा: पहिले लग्न मग ४ वर्षात घटस्फोट, दादा कोंडके यांच्या पत्नीविषयी माहिती आहे का?
महादेव बेटिंग अॅप प्रकरणात तमन्ना भाटिया पूर्वी रणबीर कपूर, श्रद्धा कपूर, क्रिस्टल डिसूजा, करण वाही, कपिल शर्मा आणि इतर काही कलाकारांना समन्स बजावण्यात आले होते. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, या प्रकरणात आत्तापर्यंत ईडीने एकूण ४९० कोटींहून अधिक मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. तसेच या अॅपच्या माध्यमातून सर्वसामान्यांना अमिष दाखवण्यात येत आहे. जर तुम्ही या अॅपमध्ये ५७ हजार रुपये गुंतवले तर दररोज तुम्हाला ४ हजार रुपये मिळणार असल्याचे आमिष दाखवण्यात आले आहे.
संबंधित बातम्या