Sunny Leone Marriage: बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी ही कायम चर्चेत असते. कधी तिच्या चित्रपटांमुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे सनी लिओनी सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसते. नुकताच सनीने दुसऱ्यांदा लग्न केले आहे. या लग्नाची सगळीकडे जोरदार चर्चा रंगली आहे. लग्नातील सनीचे फोटो पाहून सर्वांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
सनी लिओनीने पती डॅनियलसोबत पुन्हा एकदा लग्न केले आहे. त्यांनी दुसऱ्यांदा शेवटपर्यंत एकत्र राहण्याची शपथ घेतली आहे. सनीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर दुसऱ्या लग्नातील फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिने, 'पहिले आम्ही देवाच्या, मित्र परिवाच्या आणि कुटुंबीयांच्या साक्षीने लग्न केले होते. यावेळी आम्ही पाचजण एकत्र असताना लग्न केले आहे. तू माझ्या आयुष्याचे प्रेम आहेस' या आशयाचे कॅप्शन दिले आहे.
सनीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या या फोटोंमध्ये सनी लिओनीने पांढऱ्या रंगाचा गाऊन घातला आहे. तर डॅनियलने पांढऱ्या रंगाची शर्ट आणि पँट घातली आहे. तसेच सनीची तिन्ही मुले निशा, नोआ आणि अशर यांनी देखील पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. निशा ही सनीची करवली असल्याचे पाहायला मिळत आहे. तिच्या हातात फुले आहेत. आई-बाबांचे लग्न पाहायला मिळत असल्यामुळे तीनही मुलांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे.
वाचा: किरण गायकवाड आणि भाग्यश्री मोटे पहिल्यांदा एकत्र, 'या' हॉरर कॉमेडी सिनेमात करणार काम
सनीने ९ एप्रिल २०११मध्ये डॅनियलसोबत लग्न केले. शीख रितीरिवाजानुसार पारंपारिक पद्धतीने आनंद कारज समारंभात त्यांचा विवाहसोहळा पार पडला. डॅनिअलचे सनीवर जीवापाड प्रेम आहे. त्याने सनीला आजवर जवळपास सर्वच गोष्टींमध्ये पाठिंबा दिला आहे. त्यांनी २०१७मध्ये निशाला दत्तक घेतले. त्यानंतर २०१८मध्ये सरोगसीद्वारे तिला दोन मुले झाली. तिच्या मुलांची नावे अशर सिंग वेबर आणि नोआ सिंग वेबर आहे.