गेल्या काही दिवसांपासून विमानकंपनी इंडिगो ही चर्चेत आहे. या कंपनीच्या विमानांच्या उड्डाणाला होणाऱ्या विलंबनाला सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण कंटाळले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यामातून सर्वचजण संताप व्यक्त करत आहेत. आता या यादीमध्ये अभिनेत्री रिचा चड्ढाचा देखील समावेश झाला आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत इंडिगो कंपनीला सुनावले आहे.
रिचा ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत सतत शेअर करत असते. अनेकदा ती सामाजिक विषयांवर देखील बिनधास्तपण व्यक्तव्य करताना दिसते. नुकताच रिचाने इंडिगो विमानाशी संबंधीत एक्स या सोसश मीडिया अकाऊंटवर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये तिने विमानांच्या उड्डाणास होणाऱ्या उशिरावर संताप व्यक्त केला आहे.
वाचा: कतरिना कैफ आणि विजय सेतुपतीचा 'मेरी ख्रिसमस' येणार ओटीटीवर
"हे तीन दिवसांतील माझ्या तिसर्या फ्लाइट्सबद्दल आहे. पहिल्या दिवशी माझे इंडिगोचे विमान चार तासांपेक्षा जास्त उशीरा होते. दुसऱ्या दिवशी इंडिगो विमानाला पुन्हा चार तास उशीर झाला. काही मार्गांवर थेट जायचे असेल तर अनेकदा फक्त इंडिगोच्या फ्लाइट्स असतात.तिसऱ्या दिवशी माझे आंतरराष्ट्रीय फ्लाइट होते- यात काही अडचण आली नाही. १४ जानेवारीला मुंबईत एअर शो होता, त्यामुळे सकाळी रनवे बंद करण्यात आला होता. त्यानंतर उत्तर भारतात धुके असल्यामुळे दिल्लीतील रनवे बंद करण्यात आला होता. या सगळ्यामुळे देशभरातील विमानांना उशीर झाला. परिणामी कर्मचाऱ्यांना जास्त काम करावे लागेल” या आशयाची पोस्ट रिचा चड्ढाने केली आहे.
पुढे या पोस्टमध्ये तिने लिहिली आहे की, “मला आश्चर्य वाटते की, एका पायलटवर हल्ला झाला. लोकांमध्ये संताप वाढल्याने हा प्रकार घडला आहे. मात्र, मी अशा प्रकारच्या हिंसाचाराच्या विरोध करते. या सर्व घटनांमुळे मला एक धडा शिकवला. विमान कंपन्यांच्या विलंबामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. जोपर्यंत आपण हे ओळखत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचा त्रास सहन करावा लागेल. आपण असेच पैसे देऊन तोट्यात राहू. आता आपण जागे झालो नाही, तर आपण या सर्व गोष्टींना पात्र आहोत.”
काही दिवसांपूर्वी अभिनेत्री राधिका आपटे ही विमानतळावर अडकली होती. तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मुंबई विमानतळावर आलेला अनुभव सांगितला होता. त्यापाठोपाठ आता रिचा चड्ढाने पोस्ट शेअर करत आलेला अनुभव सांगितला आहे.