'आरआरआर' या सिनेमाच्या प्रचंड यशानंतर दिग्दर्शक एसएस राजामौल यांनी आपल्या पुढच्या चित्रपटाची तयारी सुरू केली आहे. राजामौली यांचा पुढचा चित्रपट दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूसोबत असणार आहे. सध्या या चित्रपटाचे नाव एसएसएमबी २९ असे आहे. या चित्रपटात महेश बाबूसोबत बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा दिसणार असल्याची चर्चा होती. आता प्रियांका चोप्रा हैदराबाद एअरपोर्टवर दिसली. त्यामुळे ती चित्रपटासाठी आली असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.
हैदराबाद विमानतळावरील प्रियांका चोप्राचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये प्रियांका कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहे. तिने तपकिरी रंगाची हुडी आणि त्यासोबत पिवळ्या रंगाची टोपी घातली आहे. प्रियांकाचा हा व्हिडिओ पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. लोक म्हणत आहेत की ती या चित्रपटासाठी भारतात आली आहे. एका युजरने लिहिले की, कदाचित प्रियांका चित्रपटाच्या लूक टेस्टसाठी आली असेल. तर काही युजर्सचे म्हणणे आहे की, प्रियांका आपल्या भावाच्या लग्नात सहभागी होण्यासाठी येथे आली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाचे शुटिंग एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. प्रियांका चोप्रा आणि एसएस राजामौली गेल्या सहा महिन्यांपासून या प्रोजेक्टबद्दल बोलत असून प्रियांका चोप्रा या चित्रपटात मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. प्रियांका चोप्राच्या शेवटच्या बॉलिवूड प्रोजेक्टबद्दल बोलायचे झाले तर ती शेवटची 'द स्काय इज पिंक' या चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित होता.
वाचा: अमृता सिंगने एकदा सैफ अली खानला दिल्या होत्या झोपेच्या गोळ्या, काय होते कारण?
प्रियांका चोप्रा गेल्या काही काळापासून सोशल मीडियावर लॉस एंजेलिसमधील भीषण आगीवर चिंता व्यक्त करत आहे. प्रियांका चोप्रा पती आणि मुलीसोबत लॉस एंजेलिसमध्ये राहते. लॉस एंजेलिसमध्ये गेल्या काही दिवसांपासून आगीचे सावट पाहायला मिळत आहे. या आगीत अनेक हॉलिवूड सेलिब्रिटींची घरे जळून खाक झाली असून अद्याप ही आग विझवण्यात आलेली नाही.
संबंधित बातम्या