अभिनेत्री नुसरत भरुचाचे नाव अशा बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक आहे, ज्यांना इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण करण्यासाठी बरीच वर्षे संघर्ष करायला लागला. अनेक वर्षे चित्रपटसृष्टीत राहून आणि कठोर परिश्रम केल्यानंतर या अभिनेत्रीला तिचा पहिला १०० कोटींच्या क्लबमध्ये एण्ट्री करणारा चित्रपट मिळाला होता. 'प्यार का पंचनामा' फेम नुसरत भरुचा आज १७ मे रोजी वाढदिवस आहे. नुसरत कुटुंबीयांसोबत ३९वा वाढदिवस साजरा करणार आहे.
अभिनेत्री नुसरत भरुचा तिच्या बोल्ड लूकसाठी आणि उत्कृष्ट अभिनयासाठी बॉलिवूडमध्ये विशेष ओळखली जाते. नुसरतने 'किटी पार्टी' या मालिकेतून अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली होती. त्यानंतर तिने बॉलिवूड पाऊल टाकले. 'जय संतोषी मां' हा तिचा पहिला चित्रपट होता. पण, या चित्रपटातून तिला फारसे यश मिळाले नाही. नुसरत ओळख मिळवण्यास अपयशी ठरली. जवळपास पाच वर्षे संघर्ष केल्यानंतर नुसरतला एकता कपूरच्या 'लव्ह सेक्स और धोखा' या चित्रपटात कास्ट करण्यात आले होते. या चित्रपटाने नुसरतचे संपूर्ण आयुष्य बदलले.
वाचा: बॉलिवूड अभिनेता राजकुमार रावच्या 'श्रीकांत'ची जेमतेम कमाई, सहाव्या दिवशी फक्त इतकी कमाई
२०११मध्ये प्रदर्शित झालेल्या 'प्यार का पंचनामा' या चित्रपटात नुसरत भरुचा कार्तिक आर्यनसोबत दिसली होती. या चित्रपटाने दोघांच्याही करिअरला एक वेगळे वळण मिळाले. 'प्यार का पंचनामा'ला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आणि नुसरतच्या कारकिर्दीला एक नवी दिशा मिळाली. त्यानंतर कार्तिक आर्यन आणि नुसरत भरुचा यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र स्क्रीन शेअर केली. २०१५ मध्ये दोघांचा 'प्यार का पंचनामा २' हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली.
वाचा: गौरव मोरेच्या 'मॅड' अदांवर बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत फिदा! पाहा रोमँटिक व्हिडीओ
२०१८मध्ये कार्तिक आर्यन, नुसरत भरुचा आणि सनी सिंह यांचा 'सोनू के टीटू की स्वीटी' हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेत्रीने नकारात्मक भूमिका साकारली असली तरी कमी बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने १०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करून सर्वांनाच चकित केले होते. यासोबतच हा चित्रपट नुसरतच्या करिअरमध्ये १०० कोटींच्या क्लबमध्ये एण्ट्री करणारा पहिला चित्रपट ठरला. यानंतर नुसरत आयुष्मान खुरानासोबत 'ड्रीम गर्ल' चित्रपटात काम करताना दिसली होती. एकता कपूरच्या या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली आणि हा चित्रपट अभिनेत्रीच्या करिअरमधील दुसरा १०० कोटींचा चित्रपट ठरला. यानंतर नुसरतने कधीच मागे वळून पाहिले नाही. आज नुसरत बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
वाचा: 'हे नाटक नाही, राखीची प्रकृती अतिशय गंभीर आहे', अत्यंत जवळच्या व्यक्तीने दिली माहिती