Kriti Sanon Property In Alibaug: राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री क्रिती सेननने नुकतीच अलिबागमध्ये एक प्रॉपर्टी खरेदी केली आहे. अभिनंदन लोढा यांच्या एचओएबीएल प्रकल्पाचा एक भाग असलेल्या या दोन हजार चौरस फुटांच्या प्रीमियम भूखंडाची किंमत दोन कोटींहून अधिक आहे. अलिबागमधील हा भूखंड खरेदी करून आता क्रिती सेनन अमिताभ बच्चन यांची शेजारी बनली आहे. अमिताभ बच्चन यांनी याच प्रोजेक्टमध्ये एप्रिल महिन्यात १०,००० चौरस फुटांचा भूखंड खरेदी केला होता.
अलिबाग हे मुंबईपासून अगदीच जवळचे ठिकाण आहे. रो-रो आणि स्पीड बोटने मुंबईला अलिबागशी जोडल्यानंतर आता अलिबागची कनेक्टिव्हिटी सुधारली आहे. शिवडी ते न्हावा शेवा यांना जोडणाऱ्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक सागरी सेतूमुळे अलिबागला जाणारा रस्ता ही आणखी सुधारला आहे. यामुळे अलिबागमध्ये येत्या काळात अंदाजे ३००० कोटी रुपयांची गुंतवणुक अपेक्षित आहे. तर, इंटिग्रेटेड टाऊनशिप आणि लक्झरी व्हिला बांधण्यासाठी अंदाजे २५० एकर जमीन टप्प्याटप्प्याने विकसित केली जाण्याची शक्यता आहे.
नियोजनानुसार मलनिस्सारण व स्टॉर्म वॉटर गटारे एचओएबीएलविकसित करणार असून, मालमत्तेचे प्रत्यक्ष बांधकाम भूखंडमालकांना स्थानिक स्वराज्य संस्था व राज्य सरकारच्या नियमानुसार करावे लागणार आहे. ऑक्युपेशन सर्टिफिकेट (ओसी) मिळाल्यानंतर १५० हून अधिक भूखंडांची विक्री होत असलेल्या २० एकर भूखंडासाठी सोसायटी स्थापन करण्यात येणार आहे. हे भूखंड दोन ते पाच हजार चौरस फुटांपर्यंत आहेत. दोन क्लबहाऊस असून या भूखंडांवरून एक नैसर्गिक पाण्याचा प्रवाह वाहतो. ज्यामुळे या जागेचे सौंदर्य आणखी वाढले आहे.
या गुंतवणुकीबद्दल बोलताना क्रिती सेनन म्हणाली, ‘स्वत:ची जमीन खरेदी करणे हा प्रवास खूप मोठा होता. माझी नजर गेल्या काही काळापासून अलिबागवर होती. मला अशीच निसर्गरम्य, शांत ठिकाण हवे होते. माझे वडीलही या गुंतवणुकीने प्रभावित झाले होते. अलिबागच्या मध्यभागी मांडवा जेट्टीपासून अवघ्या २० मिनिटांच्या अंतरावर हे प्राईम लोकेशन आहे, त्यामुळे सगळं काही जवळ आहे.’
अमिताभ बच्चन यांनी या वर्षाच्या सुरुवातीला एचओएबीएलकडून १० कोटी रुपयांना १०,००० चौरस फुटांचे भूखंड खरेदी केले होते, ज्याची किंमत १४.५ कोटी रुपये होती. अलिबागमधील ‘ए अलिबाग’ या २० एकर भूखंडाच्या प्रकल्पात हा भूखंड खरेदी केला