Video : सासूबाईंबरोबर कतरीना कैफ पोहोचली साईबाबांच्या चरणी, नेटकऱ्यांनी केले कौतुक
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Video : सासूबाईंबरोबर कतरीना कैफ पोहोचली साईबाबांच्या चरणी, नेटकऱ्यांनी केले कौतुक

Video : सासूबाईंबरोबर कतरीना कैफ पोहोचली साईबाबांच्या चरणी, नेटकऱ्यांनी केले कौतुक

Aarti Vilas Borade HT Marathi
Dec 17, 2024 06:45 PM IST

Video : सध्या सोशल मीडियावर बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी कौतुक केले आहे.

Katrina Kaif
Katrina Kaif

सध्याच्या बॉलिवूडमधील टॉपच्या अभिनेत्रींमधील एक नाव म्हणजे कतरिना कैफ. गेल्या काही दिवसांपासून कतरिना ही रुपेरी पडद्यापासून गायब आहे. ती शेवटची ख्रिसमस या सिनेमात दिसली होती. अभिनेत्री पडद्यावरुन गायब असली तरी खासगी आयुष्याची जोरदार चर्चा रंगली आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये कतरिना तिच्या सासूबाईंसोबत दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी कतरिनाचे कौतुक केले आहे.

काय आहे व्हिडीओ?

कतरिनाने अभिनेता विकी कौशलशी लग्न केले आहे. ती आता पंजाबी कुटुंबाची सून आहे. कतरिना ही सासूबाईंसोबतच राहाते. तसेच सासूबाईंबरोबर तिचा खास बॉण्ड आहे आणि हे अनेकदा काही फोटोंमधून दिसूनही आलं आहे. अशातच नुकतीच कतरिना सासूबरोबर शिर्डीला पोहोचली. तिथे दोघींनी साईबाबांचं मनोभावे दर्शन घेतलं. यावेळी कतरिनाने पंजाबी ड्रेस घातला होता तर डोक्यावर पांढरी ओढणी घेतली होती आणि सासू-सूनेचा साईबाबांच्या दर्शनाचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असणाऱ्या व्हिडीओमध्ये कतरिना साईबाबा मंदिरात हात जोडून प्रार्थना करताना दिसत आहे. त्यानंतर तिने बाबांच्या चरणी माथा टेकवला आहे. कतरिनाचा साईबाबांचे दर्शन घेतानाचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल झाले आहेत. दर्शन झाल्यानंतर दोघी पुन्हा मुंबईत परतल्या. यावेळी कतरिना सासूबाईंची विशेष काळजी घेताना दिसत आहे.
वाचा: चारित्र्यावर संशय घेण्याच्या रविंद्र महाजनी यांच्या स्वभावामुळे पत्नीने नोकरी करणे टाळले

कतरिनाच्या कामाविषयी

कतरिना कैफच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्री श्रीराम राघवनच्या ‘मेरी ख्रिसमस’ या चित्रपटात विजय सेतुपतीबरोबर दिसली होती. ही अभिनेत्री लवकरच फरहान अख्तरच्या ‘जी ले जरा’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्याबरोबर प्रियांका चोप्रा आणि आलिया भट्टही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

Whats_app_banner