Kareena Kapoor Khan tax: बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानबद्दल एक रिपोर्ट समोर आला आहे, जो बघितल्यानंतर तुम्हालाही तिचा खूप अभिमान वाटेल. तुम्हीही तिचे नक्कीच कौतुक कराल. करीना कपूर ही भारतातील सर्वाधिक कर भरणारी महिला सेलिब्रिटी ठरली आहे. फॉर्च्युन इंडिया २०२४च्या अहवालानुसार, करीनाने तिचे चित्रपट, व्यावसायिक उपक्रम आणि जाहिरातींच्या मदतीने कमावलेल्या कमाईनंतर यावर्षी सर्वाधिक कर भरला आहे. इतकंच नाही तर या प्रकरणात तिने दीपिका पदुकोण, आलिया भट्ट सारख्या अभिनेत्रींना मागे टाकलं आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, करीना कपूरने २० कोटी रुपयांचा कर भरला. यानंतर कियारा अडवाणी १२ कोटी रुपयांचा कर भरणारी अभिनेत्री तिसऱ्या क्रमांकावर आहे. कतरिना कैफ ११ कोटी रुपयांच्या करासह या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
भारतीय सेलिब्रिटींमध्ये शाहरुख खान सर्वाधिक कर भरणारा अभिनेता ठरला आहे. शाहरुखने सर्वाधिक ९२ कोटी रुपयांचा कर भरला आहे. त्याखालोखाल साऊथ स्टार थलापति विजयचा नंबर लागतो, ज्याने ८० कोटी रुपयांचा कर भरला आहे. तर, सलमान खानने ७५ कोटी रुपयांचा कर भरला आहे. या यादीमध्ये सर्वाधिक कर भरणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये टॉप-३ मध्ये स्थान मिळवणारा विजय हा साऊथ चित्रपटसृष्टीतील एकमेव अभिनेता आहे. विजयचा 'गोट-ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम' हा चित्रपट ५ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. साऊथच्या इतर कलाकारांबद्दल बोलायचे झाले, तर मोहनलाल आणि अल्लू अर्जुन यांनीही खूप मोठ्या रकमेचा टॅक्स भरला आहे. दोघांनीही १४ ते १४ कोटी रुपयांचा कर भरला आहे.
करीना कपूर खान पडद्यावर कमी दिसत असली, तरी यामुळे तिच्या उत्पन्नावर कोणताही परिणाम झालेला नाही. त्यामुळे अभिनेत्री दरवर्षी २० कोटी रुपये टॅक्स भरत आहे. करीना कपूरने २०००मध्ये 'रिफ्युजी' चित्रपटातून पदार्पण केले. या अभिनेत्रीला आता बॉलिवूडमध्ये २४ वर्षे झाली आहेत. इतक्या वर्षांच्या कारकिर्दीत बेबोने खूप प्रसिद्धी मिळवली आहे. प्रसिद्धीसोबतच करीना कपूरने तिच्या मेहनतीतून आणि टॅलेंटने खूप पैसाही कमावला आहे. कोइमोईच्या रिपोर्टनुसार, करीना कपूर ४८५ कोटी रुपयांच्या संपत्तीची मालक आहे. ती दरवर्षी १० ते १२ कोटी रुपये कमावते. करीना कपूर खानचा 'बकिंगहॅम मर्डर' हा चित्रपट आता प्रदर्शित होणार आहे. बालाजी मोशन पिक्चर्स निर्मित आणि हंसल मेहता दिग्दर्शित या थ्रिलर चित्रपटाचे दिग्दर्शन हंसल मेहता यांनी केले आहे.