बॉलिवूडमध्ये अफेअर, ब्रकेअप, लग्न आणि घटस्फोट या गोष्टी सरास होत असतात. कधी कोण कोणाला डेट करेल याचाही नेम नसतो. सध्या सोशल मीडियावर एका अभिनेत्रीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ही अभिनेत्रीने सेक्स, ब्रेकअप आणि रिलेशनशीपवर आश्चर्यकारक विधाने केली आहेत. तिने थेट ब्रेकअप करण्यासाठी दुसऱ्या मुलासोबत सेक्स केल्याचे सांगितले आहे. आता ही अभिनेत्री कोण? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून कल्की कोचलिन आहे.
अभिनेत्री कल्की कोचलिन ही कायमच तिच्या धक्कादायक विधानांमुळे चर्चेत असते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने सेक्स, ब्रेकअप आणि रिलेशनशीपवर आश्चर्यकारक विधाने केली आहेत. तिने सांगितले की, ती पॉलीगॅमी रिलेशनशिपमध्ये होती. पॉलीगॅमी रिलेशनशिप म्हणजे एकाच वेळी एकापेक्षा जास्त व्यक्तींसोबत रिलेशनशिपमध्ये राहणे. इतकंच नाही तर तिने आणखी अनेक वादग्रस्त विधाने केली आहेत. सध्या सोशल मीडियावर कल्कीचा या सर्व विषयांवर बोलतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
नुकताच कल्कीने 'हॉटफ्लाय'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये कल्कीला विचारण्यात आले होते की ब्रेकअपसाठी काही नियम आहेत का? त्यावर तिने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले. "होय! ब्रेकअपसाठी काही नियम असतात. ब्रेकअपनंतर सहा महिने तुम्ही तुमच्या एक्ससोबत मैत्री करू नये, असे मला वाटते. जर तुमचे नाते दीर्घ असेल तर ब्रेकअपनंतर तुम्ही वर्षभर मित्रांसारखे राहू नये" असे म्हटले आहे.
या मुलाखतीमध्ये कल्कीला विचारण्यात आले की, ब्रेकअपनंतर किती दिवसांनी दुसऱ्या रिलेशनशिपमध्ये यावे? हा प्रश्न ऐकून कल्कीला हसू आले. तिने त्यावर "दोन आठवडे... आणि आपल्या एक्सला सगळीकडून ब्लॉक करा. आपला एक्स काय करतो आहे हे आपण पाहू नये. तो कसा आहे? हे जाणून का घ्यायचे असते. या सगळ्यामुळे स्वत:ला त्रास होतो आणि आपण स्वत:ला काही तरी करुन घेऊ शकतो. म्हणून लांब रहावे" असे उत्तर कल्कीने दिले.
याच मुलाखतीमध्ये कल्कीला विचारण्यात आले की तिचे ब्रेकअप कसे झाले? त्यावर तिने, 'मला वाटते की ब्रेकअप करणे हे चांगले असते. पण थोडे अवघड देखील असते. मी लहान असताना ब्रेकअप करण्यासाठी दुसऱ्या मुलासोबत सेक्स करायचे. त्यानंतर स्वत: जाऊन बॉयफ्रेंडला सांगयचे. मग आमचा ब्रेकअप व्हायचा' असे उत्तर दिले.
वाचा: पतीच्या निधनानंतर खचून गेल्या होत्या नीना कुलकर्णी, आज दोन्ही मुले आहेत करिअरमध्ये यशस्वी
कल्की सध्या तिचा जोडीदार गाय हर्शबर्गसोबत गोव्यात राहत आहे. त्यांना एक मुलगीही आहे. गाय हर्शबर्गला डेट करण्यापूर्वी कल्कीने चित्रपट निर्माते अनुराग कश्यपसोबत लग्न केले होते. पण त्यांचे नाते फारकाळ चालले नाही.