मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Jacqueline Fernandez Building Fire: जॅकलिन फर्नांडिसच्या इमारतीला लागली आग; थोडक्यात बचावली अभिनेत्री!

Jacqueline Fernandez Building Fire: जॅकलिन फर्नांडिसच्या इमारतीला लागली आग; थोडक्यात बचावली अभिनेत्री!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Mar 07, 2024 08:11 AM IST

Jacqueline Fernandez Building Fire Video: बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या इमारतीला आग लागल्याची बातमी समोर आली आहे. याचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर समोर आला आहे.

Jacqueline Fernandez Building Fire Video
Jacqueline Fernandez Building Fire Video

Jacqueline Fernandez Building Fire Video: बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या इमारतीला आग लागल्याची बातमी समोर आली आहे. याचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या बिल्डिंगमधून धुराचे लोट निघताना दिसत आहे. अग्निशमन दलाची गाडीही तिथे आग विझवताना दिसली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ही आग एका घरातील स्वयंपाकघरात लागली होती. या सगळ्यात जॅकलिन फर्नांडिस सुखरूप असल्याचे रिपोर्ट्समध्ये साग्न्यात आले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, वांद्रे पश्चिम येथील पाली हिल येथे नवरोज हिल सोसायटीमध्ये जॅकलिन फर्नांडिसचे हे घर आहे. बिल्डिंगमध्ये आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या, तीन जंबो टँकर आणि एक ब्रीदिंग व्हॅन तातडीने तिथे रवाना करण्यात आली. मात्र, अद्याप कोणी जखमी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. इमारतीच्या १३व्या मजल्यावरील स्वयंपाकघरात ही आग लागल्याचे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे. मात्र, या आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

Anant Ambani Pre Wedding: रिहाना ते जॉन लीजेंड; अंबानींच्या कार्यक्रमासाठी परदेशी कलाकारांनी घेतले ‘इतके’ मानधन

कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही!

मीडिया रिपोर्टनुसार, जॅकलिन फर्नांडिस या इमारतीतील आलिशान ५ बीएचके फ्लॅटमध्ये राहते. पीटीआयच्या वृत्तानुसार, नर्गिस दत्त रोडवर असलेल्या या निवासी इमारतीत रात्री ८ वाजता आग लागली. नवरोज हिल सोसायटीच्या १३व्या मजल्यावरील एका खोलीत आग लागली होती. तर, ही आग १४व्या मजल्यापर्यंत पोहोचली होती. मात्र, या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. जॅकलिनने गेल्या वर्षी मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील पाली हिलच्या आलिशान परिसरात हा फ्लॅट खरेदी केला होता. या इमारतीमध्ये सुट, पेंटहाऊस, स्काय व्हिला आणि मॅन्शन असे पर्याय आहेत.

जॅकलिन फर्नांडिस आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त!

अभिनेत्रीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, जॅकलिन फर्नांडिस आगामी चित्रपटात ॲक्शन स्टार जीन-क्लॉड व्हॅन डॅमेसोबत दिसणार आहे. या चित्रपटाद्वारे जॅकलिन फर्नांडिस हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. तिने इटलीमध्ये ॲक्शन स्टारसोबत चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. याशिवाय ती अक्षय कुमारच्या 'वेलकम टू जंगल' या चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणात ती व्यस्त आहे. दुसरीकडे, महाठक सुकेश चंद्रशेखर याच्यामुळे जॅकलिन फर्नांडिस सतत चर्चेत असते. तुरुंगात असेलला सुकेश चंद्रशेखर सतत जॅकलिन फर्नांडिसला पत्र पाठवत असतो.

WhatsApp channel