Bollywood Interesting Kissa : बॉलिवूड स्टार्सची मुलं अनेकदा आपल्या आई-वडिलांप्रमाणे एंटरटेन्मेंट इंडस्ट्रीत पाय रोवण्याचा प्रयत्न करतात. पण, सर्वच स्टार किड्स यशस्वी होत नाहीत. आलिया भट्ट आणि अनन्या पांडे सारख्या मोजकेच कलाकार असतात, ज्यांचे नशीब चमकते. तर टायगर श्रॉफ आणि तारा सुतारिया सारख्या कलाकारांना बराच काळ संघर्ष करावा लागतो. त्यानंतरही यश मिळेलच याची शाश्वती नसते. आता तुम्ही इनसाइडर आहात की, बाहेरचे आहात याने प्रेक्षकांना फारसा फरक पडत नसतो. त्यांनाच इंडस्ट्रीत स्थान मिळते, ज्यांना जनता स्वीकारते. असे अनेक स्टार किड्स आहेत, ज्यांनी इंडस्ट्रीला खूप हिट चित्रपट दिले, पण ते फार काळ टिकू शकले नाहीत. त्यामुळे त्यांना करिअरचा दुसरा पर्याय शोधावा लागला.
बॉलिवूडमधील घराणेशाही ही कोणत्याही स्टार किडसाठी यशाची हमी नसते. हे पुन्हा एकदा सिद्ध झाले, जेव्हा एका अभिनेत्याने सिनेसृष्टीत खूप चांगले पदार्पण केले. परंतु, नंतर केवळ तीन चित्रपट केल्यानंतर त्याला सिनेसृष्टीचा निरोप घ्यावा लागला. हा स्टार किड एका मोठ्या निर्मात्याचा मुलगा होता आणि त्याने श्रुती हसनसारख्या अभिनेत्रीसोबत इंडस्ट्रीत पदार्पण केले होते. पहिल्या चित्रपटात मुख्य भूमिका मिळूनही त्याला तीन चित्रपटांनंतर त्याला बॉलिवूडला रामराम करावा लागला. यानंतर त्याने स्वत:चा व्यवसाय सुरू केला. आजघडीला तो कोट्यवधींचा मालक आहे. आपण ज्याच्याबद्दल बोलत आहोत, तो आहे बॉलिवूड अभिनेता गिरीश तौरानी.
गिरीशने २०१३मध्ये ‘रमैया वस्तावैया’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. अवघ्या ३८ कोटी रुपये खर्चकरून बनलेल्या या चित्रपटाने ३८.३४ कोटींची कमाई केली होती. या चित्रपटात गिरीश श्रुती हसनसोबत स्क्रीन शेअर करताना दिसला होता आणि प्रभू देवा दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती गिरीशचे वडील कुमार एस तौरानी यांनी केली होती. कुमार तौरानी टिप्स इंडस्ट्रीत मोठ्या पदावर असून, त्यांनी खिशातून पैसे गुंतवून आपल्या मुलाला लाँच केले होते. पण, तो फार काळ इंडस्ट्रीत टिकू शकला नाही.
या चित्रपटानंतर गिरीश तीन वर्षे रिकामा बसला आणि मग त्याला वैभव मिश्रा दिग्दर्शित ‘लव्हशुदा’ नावाचा चित्रपट मिळाला. मात्र, त्याचा चित्रपट कधी आला आणि कधी गेला हे लोकांना कळलेच नाही आणि निर्मात्यांना खूप त्रास सहन करावा लागला. यानंतर, गिरीशने एका शॉर्टफिल्ममध्ये काम केलं आणि यासोबतच त्याच्या फिल्मी करिअरला पूर्णविराम मिळाला. यानंतर गिरीश टिप्स इंडस्ट्रीजमध्ये रुजू झाला आणि वडिलांना व्यवसायात मदत करू लागला. यात काका रमेश तौरानी यांनीही त्यांना मदत केली आणि आता तो टिप्स इंडस्ट्रीजचा सीओओ आहे. एका रिपोर्टनुसार, गिरीश आज ४७००० कोटींचा व्यवसाय करतो.