बॉलिवूड अभिनेते टीकू तलसानिया यांच्याबाबत एक बातमी समोर आली होती. त्यांना हृदयविकाराचा झटका आला असून प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता अभिनेत्याची पत्नी दीपाती तलसानिया हिने आपल्या पतीच्या तब्येतीची माहिती दिली आहे. टीकूला हृदयविकाराचा झटका नसून ब्रेन स्ट्रोक आल्याचे त्यांनी सांगितले आहे.
दीपाती यांनी नुकताच एनडीटीव्हीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्या म्हणाल्या, 'टीकू यांना हृदयविकाराचा झटका नाही तर ब्रेन स्ट्रोक आला आहे. ते एका चित्रपटाच्या स्क्रिनिंगला गेले होते. घरी आल्यावर रात्री आठच्या सुमारास त्यांची प्रकृती अचानक खालावली. त्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. टीकू सध्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात उपचार घेत आहे.'
याआधी अभिनेत्री रश्मी देसाईने रात्री स्क्रीनिंगमध्ये टीकू भेटल्यानंतर त्यांच्या तब्येतीची माहिती दिली होती. ती म्हणाली, 'माझी त्यांच्याशी चांगली भेट झाली. मी त्यांना भेटले तेव्हा ते ठीक होते. त्यांच्या चाहत्यांनी आणि हितचिंतकांनी काळजी करण्याची गरज नाही. ते ठीक आहेत.'
पुढे रश्मी म्हणाली, 'जेव्हा मी त्याला भेटलो तेव्हा तो ठीक होता जसे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. तो खूप हुशार आणि चांगला माणूस आहे. लोक त्याच्या बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत हे पाहून चांगले वाटत आहे. मला भेटल्यानंतर त्याने दुसऱ्या कोणाशी तरी बोलून त्याला बरं वाटत नसल्याचं आणि वेदना होत असल्याचं सांगितलं. विचित्र वाटल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. '
वाचा : लेकाचा सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी आमिर खानने सोडले धूम्रपान, नेमकं काय आहे कारण? जाणून घ्या
एक से बढकर एक, हुकूम मेरे आका, गोलमाल है भाई सब गोलमाल है, प्रीतम प्यारे और वो, सजन रे झूठ मत बोलो या त्यांच्या गाजलेल्या मालिका. तसेच दिल है की मानता नाही, बोल राधा बोल, अंदाज अपना अपान, इश्क, देवदास, पार्टनर, धमाल, स्पेशल २६, सर्कस अशा अनेक चित्रपटांमध्ये ते दिसले. त्यांचा २०२४मध्ये विकी विद्या का वो वाला व्हिडीओ हा सिनेमा प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्यांच्यासोबत राजकुमार राव, तृप्ती डिमरी, मल्लिका शेरावत, विजय राज आणि अर्चना पूराण सिंह दिसले होते.
संबंधित बातम्या