Sunny Leone One Night Stand: बॉलिवूड अभिनेता तनुज विरवानी काही दिवसांपूर्वीच बाबा बनला आहे. सध्या तनुज पत्नी आणि आपल्या बाळासोबत वेळ घालवत आहे. दरम्यान, अभिनेता पारस छाबराच्या पॉडकास्टमध्ये अभिनेत्याने आपल्या खाजगी आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत. अभिनेत्याने नुकतंच सनी लिओनीसोबत एमटीव्ही वरील लोकप्रिय रिऍलिटी शो 'स्प्लिट्सविला १५' होस्ट केले होते. त्यामुळे त्याने पुन्हा एकदा सनी लिओनीसोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे.
२०१६ मध्ये 'वन नाईट स्टँड' चित्रपटात सनी लिओनसोबत रोमान्स करणाऱ्या या अभिनेत्याने पहिल्यांदा 'स्प्लिट्सविला १५' होस्ट करण्याचा अनुभव शेअर केला. यादरम्यान, अभिनेत्याने रणविजयची जागा घेण्याच्या प्रश्नाचे उत्तर देखील दिले. याबाबत बोलताना तो म्हणाला की, जर मी रणविजयच्या जागी होस्ट म्हणून आलो आहे, तर मी अर्जुन बिजलानीचीही जागा घेतली आहे, पण तसे अजिबात होत नाही. जेव्हा शोचे निर्माते माझ्याकडे ऑफर घेऊन आले, तेव्हा मी स्वतः काम करण्याबद्दल निश्चित नव्हतो. कारण मी कधीच कोणताही रिॲलिटी शो होस्ट केला नाही. परंतु जेव्हा त्यांनी मला सांगितले की त्यांनी मला होस्ट म्हणून कास्ट केले आहे. तेव्हा मी होकार दिला''.
सनी लिओनीसोबत काम करण्याच्या अनुभवावर तनुज म्हणाला की, सनी लिओनीसोबत काम करण्याचा अनुभव नेहमीच चांगला असतो. तिच्यासोबत माझे चांगले ट्यूनिंग आहे. तिच्याकडे एक वेगळी विनोदबुद्धी आहे. जी मला खूप आवडते. हा शो हिट होण्याचे एक कारण म्हणजे सनी आणि मी याआधीही एका हिट गाण्यात एकत्र काम केले होते. लोकांना आमची केमिस्ट्री आवडली. त्यामुळे शोमध्येही लोकांनी आम्हाला पसंती दिली. 'वन नाईट स्टँड' चित्रपटाच्या दृश्यांबद्दल विचारले असता तनुजने सांगितले की नाही, मला चित्रपटातील दृश्ये आठवत नाहीत पण सनीसोबतचे बॉन्ड चांगले होते, त्यामुळे मी शोचा खूप आनंद लुटला'.
तनुज विरवानी हा एक अभिनेता आणि मॉडेल आहे. त्याला अभिनयाचा वारसा त्याच्या आईकडून मिळाला आहे. तनुज हा बॉलिवूडमधील लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेत्री रती अग्निहोत्री यांचा मुलगा आहे. रती यांचा 'एक दुजे के लिये' हा सिनेमा आजही तितकाच लोकप्रिय आहे. रती अग्निहोत्री यांनी बिझनेसमन अनिल विरवानी यांच्याशी लग्न करत संसार थाटला होता. त्यांचा मुलगा असणाऱ्या तनुजने 'लव्ह यू सोनिया' या चित्रपटातून करिअरला सुरुवात केली होती. मात्र, चित्रपटांपेक्षा वेब सिरीजमधील त्याच्या अभिनयाचे अधिक कौतुक होत असून त्याने इंडस्ट्रीत एक खास ओळख निर्माण केली आहे.