बॉलिवूड अभिनेता सनी देओलवर फसवणूकीचा आरोप, निर्मात्याने पोलिसात दाखल केली तक्रार
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  बॉलिवूड अभिनेता सनी देओलवर फसवणूकीचा आरोप, निर्मात्याने पोलिसात दाखल केली तक्रार

बॉलिवूड अभिनेता सनी देओलवर फसवणूकीचा आरोप, निर्मात्याने पोलिसात दाखल केली तक्रार

Aarti Vilas Borade HT Marathi
May 31, 2024 08:34 AM IST

बॉलिवूड अभिनेता सनी देओल वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. एका निर्मात्यानेच सनी विरोधात तक्रार दाखल केली आहे.

Sunny Deol: सनी देओलविरोधात तक्रार
Sunny Deol: सनी देओलविरोधात तक्रार

बॉलिवूड अभिनेता सनी देओल सध्या चर्चेत आहे. त्याच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळे सनीची चर्चा रंगली आहे. सनीचे खासगी आयुष्य वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. एका निर्मात्याने सनीवर फसवणूक आणि खंडणी वसुलीचा आरोप केला आहे. या प्रकरणी निर्मात्याने पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी चौकशीसाठी सनीला समन्स बजावले आहे. सनीने यावर अद्याप उत्तर दिलेलेल नाही.

कोणी केली तक्रार

बॉलिवूड चित्रपट निर्माता सौरव गुप्ताने सनी देओल विरोधात फसवणूक आणि खंडणी वसुलीची तक्रार दाखल केली आहे. चित्रपट निर्माते झालेले रिअल इस्टेट डेव्हलपर असलेले सौरभ गुप्ता यांनी तक्रारीमध्ये नमूद केले आहे की सनीने चित्रपटात काम करत असल्याचे सांगून पैसे घेतले आहेत. मात्र, चित्रपटासाठी वेळ काढला नसून पैसे देखील परत केलेले नाहीत असे सौरभ म्हणाले आहेत.
वाचा : 'इंडियाज बेस्ट डान्सर ४'साठी ऑडिशन द्यायची आहे? मग जाणून घ्या कधी आणि कुठे होणार

सौरभ गुप्ता यांनी हिंदुस्तान टाइम्सशी संवाद सांधला. त्यावेळी ते म्हणाले की, '२०१६मध्ये चित्रपटात काम करेन असे सांगून सनी देओलसोबत डिल करण्यात आली. त्याने मुख्य भूमिकेसाठी ४ कोटींची डील केली होती. यातील एक कोटींची रक्कम अॅडव्हान्स म्हणून देण्यात आले होते. मात्र, त्याने चित्रपट पूर्ण करण्याऐवजी पोस्टर बॉईज (2017) या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण करण्याचा पर्याय निवडला. अॅडव्हान्स रक्कम देऊनही सनी देओल माझ्याकडून अधिक पैशांची मागणी करत राहिला.' माझे दोन कोटी ५५ लाख रुपये सनी देओलच्या खात्यात असल्याचे दावा गुप्ता यांनी केला. सनी देओल यांनी मला दुसऱ्या दिग्दर्शकालाही पैसे देण्यास सांगितले होते असा दावाही त्यांनी केला आहे.
वाचा: Aavesham Review: एका गँगस्टरसोबतची मैत्री! जाणून घ्या काय आहे 'आवेशम' सिनेमाची कथा

सनी देओलवर आरोप

सौरभ गुप्ता यांनी पुढे सनीवर अरोप करत सांगितले की, 'सनी देओलने २०२३मध्ये माझ्या कंपनीसोबत एक बनावट करार केला होता. जेव्हा आम्ही हा करार केला तेव्हा त्या करारनाम्यातील मधले पानही बदलण्यात आले होते. त्या ठिकाणी चित्रपटात काम करण्याच्या मानधनाची रक्कम ४ कोटींहून ८ कोटी करण्यात आली. तर, नफा दोन कोटी करण्यात आला.'
वाचा: अमोलमुळे अप्पी आणि अर्जुन पुन्हा एकत्र येणार? 'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेत मोठा ट्विस्ट

Whats_app_banner