Tiger 3 twitter review: डोकं बाजूला ठेवून पाहण्यासारखा सिनेमा! जाणून घ्या 'टायगर ३' रिव्ह्यू
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Tiger 3 twitter review: डोकं बाजूला ठेवून पाहण्यासारखा सिनेमा! जाणून घ्या 'टायगर ३' रिव्ह्यू

Tiger 3 twitter review: डोकं बाजूला ठेवून पाहण्यासारखा सिनेमा! जाणून घ्या 'टायगर ३' रिव्ह्यू

Aarti Vilas Borade HT Marathi
Published Nov 13, 2023 01:00 PM IST

Salman khan Tiger 3 Review: नुकताच प्रदर्शित झालेला सलमान खानचा 'टायगर ३' हा चित्रपट कसा आहे? हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.

Tiger 3
Tiger 3

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा प्रत्येक चित्रपट हा प्रेक्षकांसाठी खास असतो. गेल्या काही दिवसांपासून 'टायगर ३' या चित्रपटाची सर्वजण आतुरतेने वाट पाहात होते. आता दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. १२ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट कसा आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया या चित्रपटाचा ट्विटर रिव्ह्यू...

'टायगर ३' चित्रपट प्रदर्शित होताच नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. या चित्रपटाला समीक्षकांनी ३ स्टार दिले आहेत. आता प्रेक्षकांना हा चित्रपट कसा वाटला हे त्यांनी सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत.
वाचा: रश्मिका-सारापाठोपाठ ऐश्वर्या रायचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल, 'टायगर ३'मधील गाण्यावर

एका यूजरने चित्रपटाची प्रशंसा करत लिहिले आहे की, "चित्रपटामध्ये अॅक्शनसोबतच मला चित्रपटाची कथा देखील आवडली आहे. चित्रपटात सर्वच कलाकार उत्तर प्रकारे आपल्या भूमिका साकारताना दिसत आहेत. चित्रपट पाहताना कधी टाळ्या वाजवू आणि शिट्या हेच मुळात कळत नाही. नक्कीच सलमान खान याचा हा चित्रपट ओपनिंगलाच कोट्यवधी रुपयांचा बिझनेस करेल."

दुसऱ्या एका यूजरने चित्रपटाचा नकारात्मक रिव्ह्यू देत "मला सलमान खान हा या चित्रपटामध्ये खूपच जास्त सुस्त दिसत आहे. हा चित्रपट २५० कोटी रुपये देखील कमावणार नाही" असे म्हटले आहे. तिसऱ्या एका यूजरने 'डोकं बाजूला ठेवून पाहण्यासारखा सिनेमा' असे म्हटले आहे.

'टायगर ३' या चित्रपटात सलमान खानसोबत अभिनेत्री कतरिना कैफ, इमरान हाश्मी हे कलाकार देखील दिसत आहेत. हा चित्रपट १२ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर देखील चांगली कमाई करताना दिसत आहे.

Whats_app_banner