Mahadev Betting App Case: महादेव बेटिंग अ‍ॅपप्रकरणी बॉलिवूड अभिनेता साहिल खान याची ३ तास चौकशी
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Mahadev Betting App Case: महादेव बेटिंग अ‍ॅपप्रकरणी बॉलिवूड अभिनेता साहिल खान याची ३ तास चौकशी

Mahadev Betting App Case: महादेव बेटिंग अ‍ॅपप्रकरणी बॉलिवूड अभिनेता साहिल खान याची ३ तास चौकशी

Published Apr 13, 2024 09:10 PM IST

Sahil Khan Investigation: ३ तासाच्या चौकशीनंतर बॉलिवूड अभिनेता साहिल खान मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेतून बाहेर पडला.

: महादेव बेटिंग अ‍ॅपप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अभिनेता साहिल खानची ३ तास चौकशी केली.

Sahil Khan leaves from Mumbai Police Crime Branch: महादेव बेटिंग अ‍ॅपप्रकरणी (Mahadev Betting App Case) मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Mumbai Police Crime Branch) बॉलिवूड अभिनेता साहिल खानचे सुमारे ३ तास जबाब नोंदवून घेतले. महादेव बेटिंग ॲपप्रकरणी मुंबई पोलिसांनी फसवणूक आणि जुगाराच्या विविध कलमांतर्गत अनेकांविरुद्ध गुन्हा दाखल केला, ज्यात साहिल खानचेही नाव आहे. महादेव बेटिंग ॲपचा प्रचार आणि जाहिरात केल्याबद्दल त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

छत्रपतींची गादी हा महाराष्ट्राच्या काळजातला विषय; निवडणूक प्रचारात अपमान झाल्यानं किरण माने भडकले, म्हणाले…

साहिल खानवर महादेव ॲपचा प्रचार आणि प्रचार करण्यासोबतच त्यातून मोठा नफा कमावल्याचा आरोप आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बनकर यांच्या तक्रारीनंतर माटुंगा पोलिसांनी साहिल खानविरुद्ध आयपीसी कलम ४२०,४६७,४६८,४७१ आणि १२०(बी) व्यतिरिक्त जुगार कायदा आणि आयटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. महादेव बेटिंग ॲपच्या माध्यमातून लोकांची १५ हजार कोटीहून अधिक रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची आरोप केला जात आहे.

१२ तासांचं काम माझ्याकडून अर्ध्या तासांत करून घ्यायचे! प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीसोबत बॉलिवूडमध्ये दुजाभाव

साहिल खानकडून प्रसिद्धीचा गैरवापर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिल खानने आपल्या प्रसिद्धीचा गैरवापर केल्याचे आढळून आले. महादेव बेटिंग ॲपच्या प्रचारासाठी त्याने पार्टी आयोजित केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. याशिवाय त्याच्यावर खिलाडी नावाचे बेटिंग ॲप चालवल्याप्रकरणीही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुबईत झालेल्या या बेटिंग अ‍ॅपच्या पार्टीतही तो दिसला होता.

महादेव बेटिंग ॲपप्रकरणी एसआयटीची स्थापना

एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, मुंबई पोलिसांनी सांगितले की, 'महादेव बेटिंग ॲप प्रकरणी आज पोलीस साहिल खानचा जबाब नोंदवून घेतला. या प्रकरणी माटुंगा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आणि नंतर हे प्रकरण तपासासाठी मुंबई गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. याप्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात आली असून तपास सुरू आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. डिसेंबर २०२३ मध्ये मुंबई सायबर सेलच्या विशेष तपास पथकाने महादेव बेटिंग ॲपप्रकरणात साहिल आणि इतर तिघांना समन्स बजावले होते. त्यांना डिसेंबरमध्ये एसआयटीसमोर हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, ते पोलिसांच्या चौकशीसाठी हजर झाले नाही.

Whats_app_banner