भारतातील प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते राज कपूर यांनी हिंदी सिनेमाच्या इतिहासात अनेक आयकॉनिक सिनेमे दिले आहेत. वयाच्या अवघ्या 10 व्या वर्षी 'नील कमल' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या राज कपूर यांनी आपल्या कारकिर्दीत एकापेक्षा एक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. राज कपूर आपल्या प्रोफेशनल लाईफसोबतच पर्सनल लाईफमुळेही खूप चर्चेत असतात. पण तुम्हाला माहित आहे का की राज कपूर आपल्याच भावाचा एक चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच अंधश्रद्धाळू झाले होते.
राज कपूर यांना इंडस्ट्रीचा ग्रेट शोमॅन म्हटलं जातं. राज कपूर यांच्याबद्दल चित्रपटसृष्टीत अनेक किस्से आहेत. किस्से मजेशीर आहेत तर काही आश्चर्यचकित करणारे. आज आम्ही तुम्हाला राज कपूर यांच्या अशाच एका गोष्टीविषयी सांगणार आहोत. अनेकदा असे म्हटले जाते की राज कपूर यांचा अंधक्षद्धेवर विश्वास होता. खरं तर राज कपूर हे अत्यंत धार्मिक व्यक्ती मानले जायचे. पण 'सत्यम शिवम सुंदरम' हा त्यांचा सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी ते अंधश्रद्धाळू झाले होते.
राज कूपर यांनी 'सत्यम शिवम सुंदरम' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी त्यांना कोणी तरी सांगितले होते की तू मांसाहार आणि मद्यपान करणे सोडून दे. तुझा सिनेमा सुपरहिट ठरेल. राज कपूर यांनी तो सल्ला ऐकला. त्यांनी दारू पिणे आणि मांसाहार करणे बंद केले. पण आश्चर्याची बाब म्हणजे 'सत्यम शिवम सुंदरम' हा चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला. तेव्हा तो बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला.
वाचा: 'कपिल शर्मा शो'मध्ये कृष्णा अभिषेकने केली अमिताभ यांची नक्कल, रेखाला झाले हसू अनावर
१९७८ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सत्यम शिवम सुंदरम' या चित्रपटात राज कपूर यांचे बंधू शशी कपूर यांनी मुख्य भूमिका साकारली होती. तर त्यांच्यासोबत बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री झीनत अमान मुख्य भूमिकेत दिसली होती. केवळ चित्रपटाची कथाच नाही तर त्यातील गाणीही हिट झाली होती. इतकंच नाही तर या चित्रपटात झीनत आणि शशी कपूर यांच्यात चित्रित झालेले अनेक बोल्ड सीन्स चर्चेत होते. तसेच धबधब्याखाली पांढऱ्या रंगाच्या साडीत झीनतचा आंघोळीचा सीन अजूनही चर्चेत आहे. राज कपूर यांचे 'आवारा', 'श्री ४२०', 'मेरा नाम जोकर', 'बरसात', 'जगते रहो', 'राम तेरी गंगा मैली' आणि 'बॉबी' हे चित्रपट आजही चांगलेच पसंत आहेत.
संबंधित बातम्या