Govinda's Wife Sunita Ahuja: हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते गोविंदा यांची पत्नी सुनीता आहुजा नेहमीच चर्चेत असते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने सांगितले की, तिला दारू प्यायला खूप आवडते. मात्र, ती रोज मद्यपान करत नाही, असेही तिने स्पष्ट केले. ज्या दिवशी ती खूप आनंदी असते, त्याच दिवशी ती दारूला हात लावते.
कर्ली टेल्सला दिलेल्या मुलाखतीत सुनीता आहुजा म्हणाली की, ‘ही माझी आवडती जागा आहे आणि ब्लू लेबल ही माझी आवडती दारू आहे. जेव्हा जेव्हा मी आनंदी असते, तेव्हा मी मद्यपान करते. उदाहरणार्थ, काही दिवसांपूर्वीच जेव्हा यशचे लाँचिंग झाले, तेव्हा मला इतका आनंद झाला होता की, मी एकटीच एक संपूर्ण बाटली संपवली होती. भारत-पाकिस्तान सामना झाला तरी मी पूर्ण बाटली संपवते. मी दररोज मद्यपान करत नाही, मी फक्त रविवारी मद्यपान करते. तो दिवस माझा आनंदाचा दिवस आहे.’
मुलाखतीदरम्यान, जेव्हा सुनीता आहुजाला विचारण्यात आले की, ती तिचा वाढदिवस कसा साजरा करते, तेव्हा सुनीता म्हणाली की, ती तिच्या वाढदिवसाला स्वतःसोबत वेळ घालवते. ती म्हणाली की, ‘मी माझे संपूर्ण आयुष्य माझ्या मुलांची काळजी घेण्यात घालवले आहे, परंतु आता ते मोठे झाले आहेत. आता मला स्वत: बरोबर वेळ घालवायला मिळतो. मी प्रत्येक वाढदिवसाला एकटीच बाहेर जाते. कधी देवी आईचे मंदिर तर कधी गुरुद्वारा. मग रात्री ८ वाजले की, मी बाटली उघडून एकटाच केक कापून दारू पिते. आता मला एकटं राहायला आवडतं. ’
संबंधित बातम्या