नव्वदच्या दशकातील हा अभिनेता आज चित्रपटांपासून दूर असला तरी अनेकदा कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. या अभिनेत्याच्या विनोदाच्या टायमिंगने प्रेक्षकांना अक्षरश: लोटपोट केले आहे. मात्र, प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या या अभिनेत्याच्या खासगी आयुष्यात अनेक अडचणी होत्या. त्याने त्याच्या कुटुंबातील ११ सदस्यांचा मृत्यू पाहिले. तसेच चार महिन्यांची त्याची लेक डोळ्यादेखत गेली. आता हा अभिनेता नेमका कोण आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
या सुपरस्टार अभिनेत्याचे नाव गोविंदा आहे. गोविंदाने स्वत: एका मुलाखतीत सांगितले की, त्याने आपल्या कुटुंबातील ११ सदस्यांना डोळ्यांसमोर हे जग सोडताना पाहिले आहे. २०१४ मध्ये बॉम्बे टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत गोविंदा म्हणाला होता की, 'मी माझ्या कुटुंबातील ११ सदस्यांना कायमचा निरोप घेताना पाहिले आहे. मी स्वतःच्या मुलीला या जगातून निघून जाताना पाहिले आहे.'
पुढे गोविंदा म्हणाला की, 'माझी पहिली मुलगी चार महिन्यांची होती तेव्हा तिचा मृत्यू झाला. ती लवकर जन्मलेले बाळ होती. मुलीशिवाय माझे वडील, आई, दोन चुलत भाऊ, दीर आणि बहीण यांचा मृत्यू मी स्वत: पाहिला आहे. या सर्व मुलांना मी लहानाचे मोठे केले आहे. त्यामुळे माझ्यावर खूप भावनिक आणि आर्थिक दबाव आला होता." गोविंदाचे हे वक्तव्य त्यावेळी चर्चेत होते. कुटुंबातील ११ सदस्यांचा मृत्यू पाहिल्यानंतर गोविंदा मानसिक दृष्ट्या थोटा खचला होता. त्याला यामधून बाहेर येण्यास बराच वेळ लागला.
वाचा: 'पब्लिसिटी स्टंट', अरशद वारसीने प्रभासला जोकर म्हटल्याने दाक्षिणात्य कलाकार संतापले
चार महिन्यांच्या मुलीच्या जाण्यानंतर गोविंदा दोन मुलांचा बाप झाला. त्यांची मुलगी नर्मदा हिने आपले नाव बदलून टीना आहुजा असे ठेवले आहे. तर त्यांचा मुलगा यशवर्धन चित्रपटात येण्याच्या तयारीत आहे. गोविंदाची भाची आरती सिंह टीव्ही अभिनेत्री आहे. नुकताच तिचे लग्न झाले आहे. त्याचा पुतण्या कृष्णा अभिषेक टीव्ही विश्व आणि कॉमेडी विश्वातील एक मोठं नाव आहे. तर त्याची दुसरी भाची रागिणी खन्ना देखील टीव्ही अभिनेत्री आहे.
कृष्णा आणि गोविंदा यांच्यातील वाद कश्मिरा शाहच्या एका ट्विटने सुरू झाला होता. झालं असं की, कृष्णा एक शो करत होता, ज्यात गोविंदाने आधी येण्यास नकार दिला होता. पण, कृष्णाने खूप समजूत घातल्यानंतर अभिनेत्याने होकार दिला. दरम्यान, कृष्णा अभिषेकची पत्नी कश्मिरा शहाने एक ट्विट केले, ज्यामध्ये तिने लिहिले की, काही लोक केवळ पैशासाठी नाचतात. गोविंदाची पत्नी सुनीताला कश्मिराचे हे ट्विट आपल्या कुटुंबासाठी असल्याचे वाटले. त्यानंतर दोन्ही कुटुंबांमध्ये तणाव निर्माण झाला. कश्मिरा आणि सुनीता यांनी एकमेकांविरोधात अनेक वक्तव्ये केली.