बॉलिवूड अभिनेता गोविंदाची तब्येत शनिवारी अचानक बिघडली आहे. अभिनेत्याची तब्येत बिघडली तेव्हा तो जळगावमध्ये होता. तेथे त्याला चार ठिकाणच्या निवडणूक रॅलीमध्ये सहभागी व्हायचे होते. मात्र, गोविंदाची तब्येत बिघडल्याने त्याला मुंबईत आणण्यात आले. गोविंदाच्या तब्येतीशी संबंधित अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, गोविंदा जळगावच्या पाचोरा येथे सभा घेत असताना अचानक त्यांची तब्येत बिघडली. विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी तो जळगाव जिल्ह्यात गेला होता.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या प्रचारार्थ गोविंदा बोलत आहे. जळगावयेथील प्रचारसभेत गोविंदाने भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाच्या युतीला मतदान करून पंतप्रधान मोदींना पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे.
काही दिवसांपूर्वी गोविंदाच्या पायाला चुकून गोळी लागली होती. मात्र गोविंदाच्या तब्येतीबाबत अद्याप फारशी माहिती समोर आलेली नाही. काही दिवसांपूर्वी गोविंदाने चुकून स्वत:च्या पायावर गोळी झाडली होती, त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गोविंदासोबत हा प्रकार त्याच्या मुंबईतील घरी घडला. खरं तर गोविंदा घरी रिव्हॉल्व्हर साफ करत होता, त्यावेळी चुकून गोळी निघाली आणि त्याच्या पायाला लागली.
वाचा: आम्ही कधी बोललोच नाही; ९०च्या दशकात श्रीदेवीला टक्कर देण्याबाबत माधुरी दीक्षितने दिली प्रतिक्रिया
पायाला गोळी लागल्यानंतर गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला तेव्हा त्याचा पुतण्या आणि कॉमेडियन कृष्णा अभिषेक त्याला भेटण्यासाठी अभिनेत्याच्या घरी पोहोचले होते. त्यावेळी कृष्णा म्हणाला की, मामा आता ठीक आहेत. कृष्णा आणि गोविंदाच्या कुटुंबात दुरावा निर्माण झाला होता. मात्र, कृष्णा गोविंदाला भेटला तेव्हा तो म्हणाला की, आता सर्व काही ठीक आहे.