Dharmendra : वयाच्या ८८व्या वर्षी अभिनेते धर्मेंद्र यांनी नाव बदलले.. काय आहे कारण?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Dharmendra : वयाच्या ८८व्या वर्षी अभिनेते धर्मेंद्र यांनी नाव बदलले.. काय आहे कारण?

Dharmendra : वयाच्या ८८व्या वर्षी अभिनेते धर्मेंद्र यांनी नाव बदलले.. काय आहे कारण?

Aarti Vilas Borade HT Marathi
Feb 10, 2024 10:02 AM IST

Dharmendra Changes Name: 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' या चित्रपटाच्या माध्यमातून धर्मेंद्र यांनी चाहत्यांना सरप्राइज दिले आहे.

Dharmendra Changes Name (ANI Photo)
Dharmendra Changes Name (ANI Photo) (Sunil Khandare)

Dharmendra Changes Name: बॉलिवूडचे 'हिमॅन' म्हणून अभिनेते धर्मेंद्र ओळखले जातात. ते वयाच्या ८८व्या वर्षी देखील सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. धर्मेंद्र हे गेली ६४ वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. त्यांच्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांचे प्रेम मिळाले आहे. आता धर्मेंद्र यांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी नाव बदलले आहे. त्यामागे काय कारण असेल? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री क्रिती सेनॉन महत्त्वाच्या भूमिकेत असणारा 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' चित्रपटात धर्मेंद्र देखील दिसत आहेत. त्यांनी शाहिद कपूरच्या आजोबांची भूमिका साकारली आहे. याच चित्रपटाच्या माध्यमातून धर्मेंद्र यांनी चाहत्यांना मोठे सरप्राइज दिले आहे. त्यांनी ऑनस्क्रीन नाव बदलले आहे. 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया'मध्ये धर्मेंद्रला नाही तर अन्य नावाने श्रेय देण्यात आले आहे.
वाचा: पूनम पांडेला सरकार देणार मोठे गिफ्ट? आरोग्य मंत्रालयासोबत चर्चा सुरू

काय आहे धर्मेंद्र यांचे नवे नाव?

'हिंदुस्तान टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या ६४ वर्षांपासून धर्मेंद्र यांच्या नावावरच क्रेडिट दिले जात असे. पण, 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' या चित्रपटात त्याला धर्मेंद्र सिंग देओलच्या नावाने श्रेय देण्यात आले आहे. धर्मेंद्र यांचे नाव धरम सिंह देओल असेच आहे. मात्र, चित्रपटसृष्टीत त्यांनी आपले ऑनस्क्रीन नाव बदलून धर्मेंद्र असे ठेवले. त्यांनी आपले पूर्ण नाव कधीही वापरले नाही. त्यांनी कायम धर्मेंद्र असेच नाव वापरले. आता 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' चित्रपटात त्यांनी आपले पूर्ण नाव वापरण्यास सुरुवात केली आहे. यामागचे नेमके कारण काय, हे अद्यापही समोर आले नाही. धर्मेंद्र यांच्याकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया'ची काय आहे कथा?

'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' या चित्रपटात अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री क्रिती सेनॉन महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. शाहिद आर्यन नावाच्या मूलाची भूमिका साकारताना दिसत आहे. तर किर्ती सिफ्रा नावाच्या मूलीचे पात्र साकारत आहे. आर्यनने सिफ्राशी लग्न करण्याचा निर्णय घेतो आणि तिची त्याच्या कुटुंबाशी ओळख करून देतो. तो त्याच्या कुटुंबाला सिफ्रा रोबोट असल्याबद्दल सांगत नाही आणि इथूनच गोष्टी चुकीच्या होऊ लागतात. एका हटके विषयावर आधारित या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Whats_app_banner