अभिनेता अक्षय कुमारने परेश रावल यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. खरं तर 'हेरा फेरी ३'चं शूटिंग सुरू झालं होतं, बाबू भैय्याच्या पुनरागमनाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते आणि मग परशा रावल यांनी ही कल्ट कॉमेडी मध्येच सोडली. हिंदुस्थान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, चित्रपटाचे निर्माते अक्षय कुमार यांनी परेश रावल यांच्यावर २५ कोटी रुपयांचा दंड मागितला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परेश रावलने या चित्रपटासाठी करारावर स्वाक्षरी केली होती, शूटिंग सुरू झाले होते आणि त्यांनी अॅडव्हान्स फीही घेतली होती. अशा तऱ्हेने चित्रपट मध्येच सोडल्याने चित्रीकरणावर कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
या प्रकरणाशी संबंधित एका सूत्राने सांगितले की, "जर परेशजींना हा चित्रपट करायचा नसता तर ते आधी नकार देऊ शकले असते, परंतु त्यांनी केवळ करारावर स्वाक्षरी केली नाही तर पैसे देखील घेतले आणि शूटिंगमध्ये भाग घेतला. अशा तऱ्हेने चित्रपट मध्येच सोडणे हे अत्यंत अनप्रोफेशनल वर्तन आहे. हे प्रकरण न्यायालयापर्यंत पोहोचले असून निर्माते परेश रावल यांच्या जागी दुसऱ्या अभिनेत्याला चित्रपटात घेणार का, परेश रावल यांची समजूत काढणार की चित्रपट थांबवणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
परेश रावल यांनी स्वत: 'हेरा फेरी ३' सोडल्याची पुष्टी केली आहे. पैसे किंवा क्रिएटिव्ह डिफरन्समुळे चित्रपटातून माघार घेण्याचा निर्णय घेतला नसल्याचं त्यांनी सांगितलं होतं. याचे कोणतेही ठोस कारण त्यांनी दिले नाही. एवढेच सांगितले की "मला आता इच्छा नाही."
संबंधित बातम्या