Salman Khan: फूटपाथवरून सलमान खान चालवत होता गाडी, पोलिसांनी पाहिले अन्… वाचा नेमकं काय झालं?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Salman Khan: फूटपाथवरून सलमान खान चालवत होता गाडी, पोलिसांनी पाहिले अन्… वाचा नेमकं काय झालं?

Salman Khan: फूटपाथवरून सलमान खान चालवत होता गाडी, पोलिसांनी पाहिले अन्… वाचा नेमकं काय झालं?

Aarti Vilas Borade HT Marathi
Published Oct 17, 2024 06:34 PM IST

Salman Khan: बॉलिवूड अभिनेता आसिफ शेखने सलमान खानशी संबंधित एक किस्सा सांगितला आहे. त्याने सांगितले की, एकदा तो सलमान खानसोबत कुठेतरी जात होता. सलमान ज्या प्रकारे गाडी चालवत होता तेव्हा त्याला पोलिसांनी अडवले होते.

Salman Khan
Salman Khan

बॉलिवूड अभिनेता सलमान खान बऱ्याच काळापासून चित्रपटसृष्टीत काम करत आहे. इंडस्ट्रीत त्याचे अनेक मित्र आहेत. त्याच्या मित्रांकडून नेहमीच अनेक गमतीशीर किस्से ऐकायला मिळतात. आता बॉलिवूड अभिनेता आणि सलमानचा मित्र आसिफ शेखने सलमान खानशी संबंधित एक किस्सा सांगितला आहे. कदा तो सलमान खान कारमधून एकत्र जात होते. त्यावेळी सलमान खान खूपच भयानक गाडी चालवत होता. ते पाहून त्याला पोलिसांनी देखील अडवले होते असे आसिफ म्हणाला.

आसिफ शेखने नुकतीच लल्लनटॉपला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने सलमान खानसोबतचा किस्सा सांगितला आहे. '१९९८ साली सलमान खान बंधन या चित्रपटाचे चित्रीकरण करत होता. तेव्हा त्याच्याकडे एस्टीम ही गाडी होती. त्यावेळी आम्ही खूप लहान होतो आणि सलमान मोठा असल्यामुळे आम्ही त्याचा आदर करायचो. सलमानने मला त्याच्या शेजारी बसवले आणि गाडी चालवायला सुरुवात केली. तो फूटपाथवर, रस्त्यावर सगळीकडे ते गाडी चालवत होता. मी घाबरुन सलमानला म्हणालो की आपण असे पकडले जाऊ. तेव्हा सलमानने मला उत्तर दिले की अजिबात घाबरु नकोस. जर पकडलो गेलो तर मी सलमान खान तुझ्यासोबत आहे' असे आसिफ म्हणाला.

जेव्हा पोलिसांनी थांबववे

पुढे आसिफने पोलिसांनी जेव्हा पकडले तेव्हा काय झाले? याविषयी सांगितले आहे. 'फूटपाथवरील गाडी पाहून लगेचच एका ट्रॅफिक पोलिसाने आमची गाडी थांबवली. त्यांनी गाडीची खिडकी खाली करायला लावली. सलमानला वाहतूक पोलिसांनी ओळखले देखील नाही. त्याने सलमानकडे पाहिले आणि थेट म्हटले मी तुला ओळखत नाही' असे आसिफ म्हणाला. पुढे आसिफने सलमानला मजेशीर अंदाजात म्हटले की, तू शर्ट काढ, कदाचित तुला तो ओळखेल. ते ऐकून दोघेही हसू लागले.
वाचा: तू हॉटेलमध्येच गाणे गा; अरिजीत सिंहची नक्कल करणाऱ्या स्पर्धकावर संतापला विशाल दादलानी

आसिफच्या कामाविषयी

आसिफ शेखच्या कामाविषयी बोलायचे झाले तर त्याने टीव्ही आणि चित्रपट या दोन्ही इंडस्ट्रीमध्ये काम केले आहे. 'हम लोग', 'जी हॉरर', 'चंद्रकांता', 'येस बॉस', 'दिल मिल गए', 'चिडिया घर' आणि 'भाभीजी घर पर हैं' या मालिकांमध्ये काम केले आहे. चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर त्याने बंधन, परदेसी बाबू, प्यार किया तो डरना क्या, हसीना मान जाएगी, मैंने दिल तुझको दिया आणि किसी का भाई किसी की जान यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Whats_app_banner