'लगान'चा मूळ क्लायमॅक्स होता वेगळा! आमिर खानला 'या' व्यक्तीची करायची होती हत्या-bollywood actor aamir khan changes lagaan movie climax ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  'लगान'चा मूळ क्लायमॅक्स होता वेगळा! आमिर खानला 'या' व्यक्तीची करायची होती हत्या

'लगान'चा मूळ क्लायमॅक्स होता वेगळा! आमिर खानला 'या' व्यक्तीची करायची होती हत्या

Aarti Vilas Borade HT Marathi
Sep 04, 2024 11:10 AM IST

Lagaan: आमिर खानचा 'लगान' हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. पण या चित्रपटात चित्रीकरण सुरु असताना अनेक बदल करण्यात आले. अशाच एक सीनविषयी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Lagaan
Lagaan

बॉलिवूड अभिनेता आमिर खानच 'लगान' हा चित्रपट या चित्रपटाचा भाग असलेला प्रत्येक अभिनेता प्रसिद्ध झाला आणि आशुतोष गोवारीकर यांच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या यादीमध्ये या चित्रपटाचा समावेश झाला. फार कमी लोकांना माहित आहे की आमिर खानने हा चित्रपट साइन करण्यापूर्वी दिग्दर्शक आशुतोष हा चित्रपट घेऊन हृतिक रोशन आणि शाहरुख खान सारख्या स्टार्सकडेही गेले होते. पण सर्वांनी या चित्रपटाला नकार दिला होता. आमिरने पाच मिनिटे स्क्रीप्ट ऐकल्यानंतर लगेच चित्रपटाला होकार दिला होता. पण नंतर त्याने दिग्दर्शकाला चित्रपटात काही बदल करण्यास सांगितले.

चित्रपटाचे अनेक नियम मोडले

आमिर खानने 'लगान' या चित्रपटात अनेक बदल केले होते. फार कमी लोकांना माहित आहे की चित्रपटात दाखवलेला क्लायमॅक्स आशुतोष गोवारीकर यांनी अगदी शेवटच्या मिनिटाला बदलला आहे. आमिर खानने एका मुलाखतीत लगान चित्रपटाच्या आठवणींना उजाळा दिला होता. आमिरने सांगितले की, त्याने मुख्य प्रवाहातील सिनेमाचे अनेक नियम मोडले आहेत, जे क्वचितच कोणत्याही निर्मात्याने मान्य केले असतील. "कधीकधी मला आश्चर्य वाटते की मी अशा चित्रपटाची निर्मिती केली ज्यासाठी त्याकाळी लंडनला जाऊन शूटिंग आणि ब्रिटिश कलाकारांना कामावर ठेवणे आवश्यक होते" असे आमिर म्हणाला.

ऐनवेळी बदलण्यात आला क्लायमॅक्स

आमीर खानने सांगितले की त्याने ही स्क्रीप्ट वेगवेगळ्या कलाकार आणि निर्मात्यांना दाखवली होती. त्याला कोणीतरी असेही सांगितले होते की त्याने क्लायमॅक्स बदलावा. खरं तर पटकथा वाचल्यानंतरही आमीर खानने आशुतोषला दुसऱ्या अभिनेत्याला मुख्य भूमिकेत घेण्याचा विचार करण्यास सांगितले होते. मग कुणीतरी सुचवलं की चित्रपटाच्या शेवटी मॅच विनिंग क्लायमॅक्सऐवजी भुवनने इंग्रज अधिकाऱ्याची हत्या केल्याचे दाखवायला हवे. याबद्दलही चर्चा झाली.
वाचा: बॉलिवूडमधील सर्वात मोठा फ्लॉप सिनेमा यूट्यूबवर प्रदर्शित! बजेट ४५ कोटी आणि कमाई ०.०१ कोटी

मात्र, नंतर आमीर खानने क्लायमॅक्स बदलण्याचा निर्णय घेतला आणि शेवटी चित्रपटाचा विनिंग क्लायमॅक्स दाखविण्यात येणार असल्याचे ठरले. आमिर खान आणि आशुतोष गोवारीकर यांच्यात चित्रपटाच्या अनेक सीन्स आणि क्लायमॅक्सबद्दल बराच वेळ चर्चा झाली.

'लगान' हा चित्रपट २००१ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचा आमिर खान निर्माता होता. तसेच किरण राव देखील या चित्रपटासाठी काम करत होती. या चित्रपटादरम्यान दोघांमध्ये जवळीक निर्माण झाल्याचे म्हटले जाते. या चित्रपटाने त्यावेळी बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती.

विभाग