बॉलिवूड अभिनेता अमोल पालेकर हे आपल्या काळातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहे. त्यांनी बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. नुकतेच एका मुलाखतीमध्ये त्यांनी आपल्या करिअरबद्दल सांगितले आहे. त्यांनी बॉलिवूडसुपरस्टार राजेश खन्ना यांच्याविषयी भाष्य केले. सेटवर ते कसे वागायचे हे सांगितले आहे. राजेश खन्नासारख्या सुपरस्टारने आपल्या सहकलाकारांचा अपमान करू नये, असे अमोल पालेकर यांनी या मुलाखतीत सांगितले. त्यांच्या या वक्तव्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
अमोल पालेकर यांनी 'लल्लनटॉप'शी खास संवाद साधताना. या मुलाखतीमध्ये त्यांनी राजेश खन्ना यांचा उल्लेख केला. राजेश खन्ना यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अमोल पालेकर म्हणाले, 'कोणत्याही अभिनेत्याने, विशेषत: राजेश खन्नासारख्या सुपरस्टारने आपल्या सहकलाकारांचा अपमान करू नये. त्याची गरज नाही. तुम्ही सुपरस्टारच राहाल. आपल्या इंडस्ट्रीत असं म्हटलं जातं की अरे हा अभिनेता ढासू आहे. त्याने संपूर्ण सीन खाल्ला. त्याने त्याच्या सहकलाकाराला अक्षरश: खाऊन टाकले. अशा अभिनेत्याला मी नरभक्षक म्हणतो. मी अशा नरभक्षक अभिनेत्यांपैकी नाही.'
आंचल चित्रपटातील एका विशिष्ट घटनेचा उल्लेख करताना अमोल पालेकर म्हणाले, 'त्या सीनमध्ये माझी कोणतीही लाईन नव्हती. मी एक शब्दही बोललो नाही. तरीही तो माझ्यापेक्षा सरस आहे हे जगाला दाखवण्याची गरज त्याला वाटली. हा अभिनेता किती लहान आहे, हे त्यांना का कळायला हवं? माझ्या उंचीमुळे तुमची उंची ठरत नाही किंवा वाढतही नाही. मी त्याचा विचार करत राहिलो, पण मग मी त्या क्षणी ठरवलं की मी असं कधीच होऊ देणार नाही. हे मी दुसऱ्या कोणासोबतही करणार नाही.'
राजेश खन्ना आणि अमोल पालेकर आंचल चित्रपटात एकत्र दिसले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटानंतर राजेश खन्ना आणि अमोल पालेकर यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. खरं तर या चित्रपटात एक सीन असा होता की, अमोल पालेकर यांना राजेश खन्नायांच्या चरणी बसून माफी मागावी लागली होती आणि राजेश खन्ना यांना लाथ मारावी लागली होती. अमोल पालेकर यांनी हा सीन करण्यास नकार दिला. या दृश्यात समोरच्या व्यक्तिरेखेचा ऱ्हास होत आहे, असे अमोर यांना वाटले होते.
वाचा: सूरज चव्हाणवर आली सिमेंटच्या गोणी उचलण्याची वेळ, गावात राबतानाचा व्हिडीओ व्हायरल
चित्रपटाचे दिग्दर्शक आणि राजेश खन्ना यांनी एक प्लॅन बनवला. चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल गांगुली यांनी अमोल पालेकर यांना सांगितले की, त्यांना फक्त राजेश खन्ना यांच्या चरणी बसायचे आहे. अमोलने हा सीन मान्य केला. यानंतर सीन सुरू असताना आणि अमोल राजेश खन्नाच्या पायाजवळ बसले तेव्हा दिग्दर्शक राजेश खन्ना यांनी अमोलला लाथ मारण्याचा इशारा केला. राजेश खन्ना यांनीही तेच केले. यानंतर राजेश खन्ना आणि अमोल पालेकर यांच्यात दुरावा निर्माण झाल्याचं बोललं जातआहे.
संबंधित बातम्या