सलमान खानच्या जीवाला धोका! का व्हायरल होतेय बॉडीगार्ड शेराची ‘ती’ मुलाखत? नेमकं काय म्हणाला?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  सलमान खानच्या जीवाला धोका! का व्हायरल होतेय बॉडीगार्ड शेराची ‘ती’ मुलाखत? नेमकं काय म्हणाला?

सलमान खानच्या जीवाला धोका! का व्हायरल होतेय बॉडीगार्ड शेराची ‘ती’ मुलाखत? नेमकं काय म्हणाला?

Published Oct 15, 2024 09:52 AM IST

Bodyguard Shera Interview : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर सलमान खानचा बॉडीगार्ड शेराची एक जुनी मुलाखत तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शेरा भाईजानला वाचवताना आपल्यासमोर सर्वात मोठं आव्हान काय आहे, हे सांगताना दिसला आहे.

सलमान खान
सलमान खान

Bodyguard Shera Interview : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर बॉलिवूड अभिनेता सलमान खानची सुरक्षा कडक करण्यात आली आहे. ज्या टोळीने बाबा सिद्दीकीच्या हत्येची जबाबदारी घेतली आहे, तीच टोळी गेल्या काही काळापासून सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देत होती. त्यामुळे सलमानचे चाहते नाराज झाले असून, ते सलमानचा बॉडीगार्ड शेराचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर पुन्हा शेअर करत आहेत.

‘हे’ आहे सर्वात मोठं आव्हान!

शेरा गेल्या २५ वर्षांपासून सलमानसोबत आहे. गेल्या वर्षी एएनआय या वृत्तसंस्थेने शेराला सलमानच्या सुरक्षेशी संबंधित प्रश्न विचारले होते. शेरा याने त्याच्या मुलाखतीत म्हटले होते की, ‘सलमान खानच्या जीवाला धोका आहे, ज्या स्टार्सच्या जीवाला धोका आहे, त्यांना गर्दीत जाणे कठीण होते. एवढ्या मोठ्या स्टारच्या सुरक्षेचा विचार करत असताना, योग्य वेळी योग्य निर्णय घ्यावा लागतो. भाईजानच्या चाहते हाताळण्याचे सर्वात मोठे आव्हान आमच्यासमोर असते. भाई जेव्हा गर्दीच्या ठिकाणी जातो, तेव्हा आमचं काम सलमान भाईचं रक्षण करणं असतं आणि स्थानिक सुरक्षा रक्षक गर्दी हाताळतात.’

कुणी करून दिली सलमान आणि शेराची ओळख?

‘झूम टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत शेराने सांगितले होते की, सोहेल खानने त्याची आणि भाईजानची म्हणजेच सलमान खानची ओळख करून दिली होती. सोहेल भाईने एका स्टेज शो दरम्यान माझी सलमान भाईशी ओळख करून दिली होती. सलमान सुरक्षेचा प्रश्न होता आणि सोहेल भाईला माहित होते की, मी थोडा कडक माणूस आहे म्हणून तो म्हणाला, ‘तू सलमान भाईसोबत का राहत नाहीस? बस! कालांतराने मी आणि माझा भाईजान आम्ही एकत्र आलो आणि हे नातं अजूनही कायम आहे. आमची जोडी कमाल आहे. मी सरदार आहे, तो पठाण आहे आणि आम्ही एकत्र 'अजेय’ आहोत. मी माझ्या भाईजानला नेहमी सांगतो, 'जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मी तुझी सेवा करीन.'

शेराचे खरे नाव गुरमीत सिंह जॉली आहे. तो बॉलिवूडमध्ये ‘शेरा’ या नावाने ओळखला जातो. १९९५पासून शेरा सलमान खानच्या सुरक्षेची जबाबदारी घेताना दिसत आहे. यासोबतच तो टायगर सिक्युरिटी नावाची फर्म चालवतो, जी इतर कलाकारांना सुरक्षा पुरवण्याचे काम करते. २०१७मध्ये शेराने गायक जस्टिन बीबरचा बॉडीगार्ड म्हणूनही काम पाहिलं होतं. त्यावेळी जस्टिन मुंबईत परफॉर्म करण्यासाठी आला होता.

Whats_app_banner