Bobby Deol Dance on Jamal Kudu: सध्या बॉबी देओल हा त्याचा आगामी चित्रपट 'अॅनिमल'मधील भूमिकेमुळे चर्चेत आहे. एकही डायलॉग नसताना, १०-१५ मिनिटांच्या सीनमध्ये बॉबी देओलने प्रेक्षकांची मने जिंकली. तसेच या चित्रपटातील 'जमाल कुडू' या गाण्यावरील बॉबीचा डान्स देखील पाहण्यासारखा होता. सध्या सोशल मीडियावर बॉबीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तो भाचीच्या लग्नात जमाल कुडू गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.
सध्या देओल कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. धर्मेंद्र यांची नात निकिता चौधरीच्या विवाह सोहळ्याची तयारी सुरु आहे. उदयपुरमध्ये त्यांचा हा विवाहसोहळा पार पडत आहे. लग्नापूर्वीचे विधी सुरु असताना बॉबी देओलने त्याची सिग्नेचर मूव्ह केली आहे. त्याचा 'जमाल कुडू' गाण्यावरील डान्स व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की बॉबीसोबत इतरही पाहुणे नाचत आहे. दरम्यान, बॉबीने स्टायलिश कुर्ता आणि सफेद पायजामा घातलेला दिसत आहे. बॉबीचा हा डान्स पाहण्यासारखा आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.
वाचा: फेब्रुवारी महिन्यात ओटीटीवर मिळणार मनोरंजनाची मेजवानी! धमाल चित्रपट-सीरिज होणार रिलीज
३० जानेवारी रोजी बॉबी देओल पत्नी प्रकाश कौर, आई आणि वडील धर्मेंद्र यांच्यासोबत निकिता चौधरीच्या लग्नासाठी उदयपुरला रवाना ढाला होता. जश्न हॉटेल ताज अरावली येथे त्यांच्या राहण्याची सोय करण्यात आली. अभय देओलने निकिताच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. हा फोटो शेअर करत 'दुल्हा आणि दुल्हन, देवी आणि सज्जनो.. त्यांच्या आयुष्यातील नवीन प्रवासाला सुरुवात करताना तुमचे आशिर्वाद असणे गरजेचे आहे. मी माझ्या भाचीमध्ये एका महिलेपेक्षा जास्त एक लहान मुलीला पाहात आहे जी आज वधू बनली आहे. खरं तर हे चकीत करणारे आहे' या आशयाचे कॅप्शन दिले आहे. करण देओलने देखील या जोडीसोबतचा फोटो शेअर केला आहे.
बॉबी देओलने एका मुलाखतीमध्ये व्हायरल झालेल्या 'जमाल कुडू' गाण्याच्या सिग्नेचर मूव्ह विषयी वक्तव्य केले होते. 'जेव्हा आम्ही शुटिंग सुरु केले तेव्हा कोरिओग्राफरने सांगितले की तू असे कर. मी म्हटलं मी का करु? मी डान्स करायला सुरुवात केली. तेव्हा तो म्हणाला नाही नाही. असे करु नकोस. नंतर माझ्या भावाची भूमिका साकारणाऱ्या सौरभने म्हटले की तू असे करुन दाखवू शकतो का? तू असं करु शकतो का? तेव्हा मला अचानक आठवण झाली. आम्ही लहान असताना पंजाबला जायचो. तेथे कशा प्रकारे मद्यपान करायचो आणि डोक्यावर चष्मा ठेवायचो. मला आज आठवत नाही आम्ही असे का करायचो. हे बोलणं झाल्यावर मी अचानक डोक्यावर ग्लास ठेवला आणि ते संदीपला आवडले' असे बॉबी म्हणाल.
संबंधित बातम्या