मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Aashram 4: 'बाबा निराला' पुन्हा येतोय प्रेक्षकांच्या भेटीला, 'आश्रम ४'ची रिलीज डेट जाहीर

Aashram 4: 'बाबा निराला' पुन्हा येतोय प्रेक्षकांच्या भेटीला, 'आश्रम ४'ची रिलीज डेट जाहीर

Aarti Vilas Borade HT Marathi
Feb 17, 2024 11:37 AM IST

Aashram 4 Released Date: प्रकाश झा दिग्दर्शित आश्रम ४ च्या रिलिज डेटविषयी वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. आता याविषयीची माहिती समोर आली आहे.

Aashram 4
Aashram 4

Aashram 4 Released Date: बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल मुख्य भूमिकेत असणारी आश्रम ही एमएक्स प्लेअर या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील वेब सीरिज विशेष गाजली होती. या वेबसीरिजचे तीन सिझन सुपरहिट ठरल्यानंतर आता वेब सीरिजचा पुढचा सिझन येणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे चाहते उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे.

'आश्रम' या सीरिजचे दिग्दर्शक प्रकाश झा यांनी काही दिवसांपूर्वी तिसऱ्या सिझनची घोषणा केली. या सीरिजमध्ये अभिनेता बॉबी देओल महत्त्वाच्या भूमिकेत आहे. त्याने प्रत्येक सिझन एका वेगळ्या उंचीवर नेऊन पोहोचवला आहे. बॉबीसोबत या सीरिजमध्ये त्रिधा चौधरी, आदिती पोहनकर, दर्शन कुमार, ईशा गुप्ता यांच्या प्रमुख भूमिका आहेत. प्रकाश झा यांना या सीरिजच्या दिग्दर्शनाच्या वेळी अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागल्याचे दिसून आले आहे.
वाचा: आम्हाला रॉकस्टार व्हायचे होते; राहुल देशपांडेचा रोमँटिक अंदाजातील 'अमलताश'चा ट्रेलर प्रदर्शित

यापूर्वी या मालिकेच्या तीनही सीझनला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर बऱ्याच दिवसांपासून चौथ्या सीझनची वाट पाहत होते. अखेर तो सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आश्रमचा तिसरा सीझन हा २०२२ मध्ये आला होता. आता चौथ्या सीझनची घोषणा करण्यात आली आहे. खरं तर आश्रम ४ ही गेल्या वर्षी एमएक्स ओटीटीवर प्रदर्शित होणार होती. मात्र काही कारणास्तव ती झाली नाही. आता त्या मालिकेच्या चौथ्या सीझनची जोरदार तयारी सुरु झाली आहे. मीडियातील काही सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही मालिका डिसेंबरच्या शेवटच्या काही दिवसांत प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

प्रकाश झा दिग्दर्शित 'आश्रम' ही सीरिज एका वेगळ्या उंचीवर पोहोचली आहे. या सीरिजने बॉबीच्या करिअरला एक नवी दिशा मिळाली असे म्हणायला हरकत नाही. बॉबीने यामध्ये साकारलेली बाबा निराला ही भूमिका प्रचंड गाजली. राजकारण, ड्रग्स प्रकरण या सगळ्या विषयांमध्ये गुंतलेली ही वेबसीरिज उत्सुकता वाढवणारी आहे.आता चाहत्यांमध्ये चौथ्या सिझनची उत्सुकता पाहायला मिळते.

IPL_Entry_Point

विभाग