AR Rahman Birthday : ऑस्कर विजेते संगीतकार एआर रहमान आज (६ जानेवारी) त्यांचा ५७वा वाढदिवस साजरा करत आहेत आणि त्यांनी भारतात संगीताला एका वेगळ्या पातळीवर नेले आहे. आरआर रहमान यांनी आपल्या संगीताने जगभरात एक वेगळी ओळख निर्माण केली असून, त्यांची गाणी जगभर ऐकली जातात. एआर रहमान यांच्या संगीतात अशी जादू आहे की, ते ऐकणाऱ्या प्रत्येक श्रोत्याच्या हृदयाला स्पर्श करते. आज त्याच्या वाढदिवसानिमित्ताने जाणून घेऊया काही खास गोष्टी...
एआर रहमान यांच्या घरी संगीताची पार्श्वभूमी आधीपासूनच होती. त्यांचे वडील आर के शेखर हे स्वतः मल्याळम चित्रपटांचे प्रसिद्ध संगीत संयोजक होते आणि त्यांचा जन्म ६ जानेवारी १९६६ रोजी चेन्नई, तामिळनाडू येथे झाला होता. वडील स्वतः स्कोअर कंपोजर असताना मुलाला संगीताची आवड निर्माण होणे साहजिकच आहे आणि एआर रहमान यांच्या बाबतीत असेच घडले. त्यांनी लहानपणापासूनच संगीताचे शिक्षण घ्यायला सुरुवात केली. पण, सगळं काही सुरळीत सुरू असतानाच वयाच्या अवघ्या ९ व्या वर्षी त्यांचं पितृछत्र हरपलं. वडील गेल्यानंतर रहमान यांच्या आयुष्यात संघर्ष सुरू झाला.
एआर रहमान यांच्या वडिलांचे असे अकाली निधन, त्यांच्या संपूर्ण कुटुंबासाठी एक मोठा धक्का होते. त्याकाळी चिमुकल्या रहमान यांच्या आयुष्यात अनेक संकटे उभी राहिली. जर तुम्ही रहमानचे चरित्र 'नोट्स ऑफ अ ड्रीम' वाचले तर तुम्हाला कळेल की, रहमान यांचा जन्म हिंदू कुटुंबात झाला होता. त्यांचे खरे नाव दिलीप कुमार आहे, पण त्यांनी वयाच्या २३ व्या वर्षी इस्लाम धर्म स्वीकारला. यामागे देखील एक किस्सा आहे. त्याकाळी रहमान यांच्या बहिणीची तब्येत बिघडली होती आणि यादरम्यान डॉक्टरांनीही हात वर केले होते. अशा स्थितीत एके दिवशी त्यांची आई एका फकीरला भेटली आणि त्याच्या प्रार्थनेने त्यांची बहीण बरी झाली. यानंतर एआर रहमान यांची त्या फकीर आणि दर्ग्यावर श्रद्धा वाढली. आणि म्हणूनच त्यांनी हिंदू धर्म सोडून इस्लामचा स्वीकार केला.
रहमान यांना बालपणापासूनच संगीताची आवड होती, म्हणून त्यांनी आपल्या शाळेतील मित्रांसोबत एक बँड तयार केला आणि आपला सर्व वेळ संगीतासाठी देऊ लागले. त्यानंतर त्यांनी संगीतकारांकडे छोटी-मोठी कामं करायला सुरुवात केली. पण, नंतर त्यांचे नशीब खूप चमकले. त्यांना मणिरत्नमच्या 'रोजा' चित्रपटासाठी संगीत देण्याची संधी मिळाली आणि या चित्रपटाने रहमानचे आयुष्य बदलले. त्यांच्या पहिल्याच चित्रपटाच्या संगीतासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
संबंधित बातम्या