'काहे दिया परदेस' या झी मराठी वाहिनीवरील मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे सायली संजीव (Sayali Sanjeev). तिने काही मोजक्याच चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. तिच्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो. आज ३१ जानेवारी रोजी सायली संजीवचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्याविषयी खास गोष्टी...
सायली संजीवला बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shahrukh khan) आवडतो. एका कार्यक्रमा दरम्यान ती शाहरुखला भेटली. जेव्हा शाहरुखने तिच्याशी बोलायला सुरुवात केली तेव्हा सायली केवळ त्याच्याकडे पाहात बसली होती. या भेटीचा किस्सा स्वत: सायलीने एका मुलाखतीमध्ये सांगितला होता.
वाचा: पाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडचे दरवाजे पुन्हा उघडले! आतिफ अस्लमला पहिली संधी
“मी माझ्या मित्राच्या लग्नाला गेले होते. लग्न आणि रिसेप्शन झाल्यानंतर मी तिथून निघण्याच्या तयारीत होते. पण हॉटेलमधील सगळ्या लिफ्ट बंद करुन ठेवल्या होत्या. त्यामुळे मी तिथेच अडकून पडले होते. याचा विचार करत असतानाच एक व्यक्ती माझ्या डोळ्यासमोरुन आत गेली. तो शाहरुख खान होता. मी वेड्यासारखी बघत उभे होते. माझ्या मित्राला आणि त्याच्या कुटुंबियांना भेटून शाहरुख बाहेर आला. माझ्या मित्राने त्याला माझी ओळख करुन दिली. त्यानंतर माझा हात हातात घेऊन तो बोलत होता. पण मी नुसतेच शाहरुखकडे पाहत होते. तो काय बोलला, यातलं मला एक अक्षरही आठवत नाही. पण कोणीतरी हे सुंदर क्षण कॅमेऱ्यात टिपले. आणि याचे सगळे फोटो माझ्याकडे आहेत” असे सायली म्हणाली.
सायलीच्या कामा विषयी बोलायचे झाले तर ती 'झिम्मा २' या चित्रपटातील तिची भूमिका गाजली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘झिम्मा’ या चित्रपटाचा हा सिक्वेल होता. त्यापूर्वी ती ‘हर हर महादेव’, 'झिम्मा', 'गोष्ट एका पैठणीची', 'आटपाट नाइट्स', 'सातारचा सलमान', 'मन फकिरा', 'दाह', 'शुभमंगल ऑनलाइन' मध्ये दिसली होती. आता तिच्या आगामी प्रोजेक्टविषयी जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
संबंधित बातम्या