मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Preity Zinta Birthday Special: काय आहे प्रिती झिंटाचे खरे नाव? जाणून घ्या

Preity Zinta Birthday Special: काय आहे प्रिती झिंटाचे खरे नाव? जाणून घ्या

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 31, 2024 07:44 AM IST

Preity Zinta Real Name: अभिनेत्री प्रिती झिंटा ही सध्या चित्रपटसृष्टीपासून लांब आहे. आज ३१ जानेवारी रोजी तिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्याविषयी काही खास गोष्टी...

Preity Zinta
Preity Zinta

बॉलिवूडची 'डिंपल गर्ल' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे प्रिती झिंटा. आज ३१ जानेवारी रोजी प्रितीचा ४९वा वाढदिवस आहे. कुटुंबीयांच्या सोबत प्रिती वाढदिवस साजरा करणार आहे. प्रितीने तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने करोडो भारतीयांच्या मनावर राज्य केले आहे. पण प्रितीचे खरे नाव प्रिती नसून दुसरे काही तर आहे हे तुम्हाला माहिती आहे का? आज प्रितीच्या वाढदिवशी चला जाणून घेऊया काय आहे प्रितीचे खरे नाव...

प्रिती चित्रपटसृष्टीपासून लांब असली तर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत खरे नाव काय आहे हे सांगितले होते. ‘आज जेव्हा मी एका मीडिया आर्टिकलमध्ये माझे खरे नाव प्रीतम सिंहा झिंटा असल्याचे वाचले, तेव्हा मला स्वतःला थांबवताच आलं नाही. मी तुम्हाला सांगू इच्छिते की, ही एक फेक न्यूज आहे. या नावामागचं सत्य हे आहे की, आमच्या ‘सोल्जर’ चित्रपटाच्या सेटवर बॉबी देओल मला गंमतीने प्रीतम सिंह म्हणत असे. आमचा हा चित्रपट हिट झाला, आमची मैत्री घट्ट झाली आणि हे नाव मला इतकं चिकटलं की, आताही ते माझा पिच्छा सोडत नाहीये’ असे प्रिती म्हणाली.
वाचा: पाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडचे दरवाजे पुन्हा उघडले! आतिफ अस्लमला पहिली संधी

पुढे ती म्हणाली, 'तेव्हापासून आजपर्यंत मी लोकांना सांगून सांगून थकले आहे की, माझे खरे नाव प्रीती झिंटाच आहे आणि मी चित्रपटसृष्टीत प्रवेश केल्यानंतर माझे नाव बदलले नाही. माझ्या या खुलाशानंतर तरी मीडियावाले आपली चूक सुधारतील अशी आशा आहे.'

प्रितीच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती 'लाहोर १९४७' नावाच्या चित्रपटात सनी देओलसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटात आमिर खान कॅमिओ भूमिकेत दिसणार आहे. मीडिया रिपोर्ट नुसार, अभिनेत्री प्रीती झिंटा तब्बल ६ वर्षांनंतर या चित्रपटाद्वारे पुनरागमन करणार आहे.

WhatsApp channel