मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Sonali Bendre Birthday: अंडरवर्ल्ड डॉनच्या दबावामुळे मला...; सोनाली बेंद्रेने केला होता मोठा खुलासा

Sonali Bendre Birthday: अंडरवर्ल्ड डॉनच्या दबावामुळे मला...; सोनाली बेंद्रेने केला होता मोठा खुलासा

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 01, 2024 10:58 AM IST

Sonali Bendre personal Life: सोनाली बेंद्रे ही बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री आहे. आज तिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्याविषयी काही खास गोष्टी...

Sonali Bendre
Sonali Bendre (Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रेचा आज वाढदिवस आहे. १ जानेवारी १९७५ रोजी मुंबईत जन्माला आलेल्या सोनालीने मॉडेलिंग करत करिअरला सुरुवात केली होती. १९९४ साली तिचा पहिला सिनेमा 'आग' प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. या चित्रपटात अभिनेता गोविंदा सोनालीसोबत मुख्य भूमिकेत होता. सोनालीने त्यानंतर कधीही मागे वळून पाहिले नाही. पण तुम्हाला माहिती आहे का ९०च्या दशकात अंडरवर्ल्डमुळे सोनालीला अनेक चित्रपट गमवावे लागले होते. आज सोनालीच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया तिच्या खासगी आयुष्याविषयी...

सोनालीने काही वर्षांपूर्वी ‘द रणवीर शो’ या पॉडकास्ट कार्यक्रमामध्ये हजेरी लावली होती. या कार्यक्रमात तिने ९०च्या दशकातील बॉलिवूड इंडस्ट्रीच्या परिस्थितीवर भाष्य केले होते. तिने अंडरवर्ल्डमधील डॉनचा बॉलिवूडवर प्रभावस असल्याचे सांगितले. “नव्वदच्या दशकामध्ये बॉलिवूड दिग्दर्शक अंडरवर्ल्ड डॉन यांच्या दबावाखाली काम करायचे. दिग्दर्शकांनाही अशा परिस्थितीमध्ये कोणतीच मदत करणे शक्य नव्हते. काही चित्रपटांमधून मलाही काढता पाय घ्यावा लागला. शिवाय त्यावेळी वेगळ्या मार्गांनी बॉलिवूड चित्रपटांसाठी पैसे यायचे” असे सोनाली म्हणाली होती.
वाचा: अभिनेता आस्ताद काळेला मातृशोक! पोस्ट शेअर करत झाला भावूक

सोनाली पुढे बोलताना म्हणाली, “चित्रपट निर्मात्याच्या प्रत्येक खेळीपासून मला लांब राहायचे होते. यामध्ये मी यशस्वी सुद्धा झाले. यादरम्यान माझे पती गोल्डी बहल यांनी माझी खूप मदत केली. कोणत्या चित्रपटाची निर्मिती कोण करत आहे? कोणत्या चित्रपटामागे अंडरवर्ल्ड डॉनचे पैसे नाहीत? याबाबत गोल्डी मला माहिती द्यायचे.”

त्यानंतर सोनालीने तिला काही चित्रपटांमधून काढता पाय घ्यावा लागल्याचे देखील सांगितले. “अंडरवर्ल्ड डॉन यांच्या दबावामुळे मला अनेक चित्रपटांमधून बाहेर काढण्यात आले. या चित्रपटाची भूमिका आता आपल्या हाती येणार असे मला वाटायचे. पण अचानकच त्या भूमिकेसाठी कोणत्या दुसऱ्या अभिनेत्रीची निवड करण्यात यायची. याबाबत काहीच बोलू नको म्हणून सहकलाकार आणि दिग्दर्शकांचा माझ्यावर दबाव असायचा” असे सोनाली म्हणाली.

WhatsApp channel

विभाग