मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  वयाने ५ वर्षांनी मोठ्या असणाऱ्या संगीता बिजलानीला डेट करत होता सलमान खान, काय होते ब्रेकअपचे कारण?

वयाने ५ वर्षांनी मोठ्या असणाऱ्या संगीता बिजलानीला डेट करत होता सलमान खान, काय होते ब्रेकअपचे कारण?

Aarti Vilas Borade HT Marathi
Jul 09, 2024 07:00 AM IST

Sangeeta Bijlani Birthday: आज बॉलिवूड अभिनेत्री संगीता बिजलानीचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्याविषयी काही खास गोष्टी...

Sangeeta Bijlani: संगीता बिजलानीला डेट करत होता सलमान खान
Sangeeta Bijlani: संगीता बिजलानीला डेट करत होता सलमान खान

एकेकाळी बॉलिवूडवर आपल्या अभिनय आणि सौंदर्य कौशल्याने अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे संगीता बिजलानी. तिने १९८० साली मिस इंडियाचा किताब स्वत:च्या नावे केला होता. करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी ८० ते ९०च्या दशकात संगीताला संघर्ष करावा लागला होता. पण व्यावसायिक जीवनापेक्षा संगीता खासगी आयुष्यामुळे कायमच चर्चेत होती. आज ९ जुलै रोजी संगीताचा वाढदिवस असतो. त्यानिमित्ताने तिच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेऊया...

संगीता सलमानला करत होती डेट

१९८६ साली संगीता बिजलानी बॉलिवूडचा दबंग खान सलमानला डेट करत होती. त्यांचे नाते जवळपास १० वर्षे टिकले. ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. त्यांचे नातं लग्नापर्यंत पोहोचले होते. मात्र लग्न होऊ शकले नाही. त्यांच्या लग्नपत्रिकाही छापण्यात आल्या होत्या. पण ऐनवेळी दोघांनीही लग्न न करण्याचा निर्णय घेतला. आता त्यांनी हा निर्णय का घेतला याबद्दलचे कारण समोर आले आहे.
वाचा: “रिचार्जचे पैसे जस्टिन बिबरच्या खिशात", अनंत अंबानीच्या लग्नसोहळ्यावर मराठमोळ्या अभिनेत्रीची पोस्ट

सलमान आणि संगीताचा ब्रेकअप का झाला?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमान खान आणि संगीता बिजलानी हे दोघेही लग्न करणार होते. मात्र एक दिवस अचानक संगीता बिजलानीला सलमानच्या अफेअरबद्दल माहिती मिळाली. त्यावेळी सलमान हा सोमी अलीला देखील डेट करत होता, असे म्हटले जाते. संगीताला सोमी अली आणि सलमानच्या अफेअरबद्दल समजताच तिने त्याच्याबरोबरचे संबंध तोडून टाकले. त्याबरोबरच तिने लग्न करण्यासाठीही नकार दिला.
वाचा: जुई गडकरी हिला लग्नाच्या पंगतीतून उठवलं होतं; नेमकं काय घडलं होतं? वाचा!

ट्रेंडिंग न्यूज

क्रिकेटपटूशी केले संगीताने लग्न

संगीता बिजलानीने १९८० साली ‘मिस इंडिया’चा किताब जिंकला. त्यानंतर तिने मॉडेलिंगमध्ये करिअर सुरु केले. तिथून ती अभिनयाकडे वळली. संगीता बिजलानी आतापर्यंत अनेक चित्रपटात काम केले आहे. सलमान खाननंतर ती क्रिकेटर मोहम्मद अजहरुद्दीनला डेट करत होती. त्यांनी लग्न देखील केले. मात्र, १४ वर्षांच्या संसारानंतर संगीता आणि अजहर विभक्त झाले.
वाचा: शुटिंग सुरु असताना नीतू आणि ऋषी कपूर यांचा झाला होता ब्रेकअप, वाचा प्यारवाली लव्हस्टोरी

WhatsApp channel