Javed Akhtar lovestory: बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये लव्ह अफेअर, लग्न, घटस्फोट या गोष्टी सतत सुरुच असतात. पण बॉलिवूडमध्ये अशा काही जोड्या आहेत ज्यांचा आदर्श अनेकांसमोर उभा आहे. या यादीमधील एक नाव म्हणजे अभिनेते जावेद अख्तर आणि अभिनेत्री शबाना आझमी. एकीकडे शबाना या उत्कृष्ट अभिनेत्री तर दुसरीकडे जावेद अख्तर हे प्रसिद्ध लेखक आणि गीतकार. आज जावेद अख्तर यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांची लव्हस्टोरी...
तुम्हाला ऐकून नवल वाटेल पण जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांची पहिली ओळख शबाना आझमी यांच्या घरी झाली होती. १९७० साली जावेद अख्तर हे शबाना आझमी यांच्या घरी लेखनाचे धडे घेण्याची येत असते. शबाना या प्रसिद्ध शायर कैफी आझमी यांची मुलगी. जावेद अख्तर कवीता ऐकण्यासाठी देखील कैफी यांच्या घरी येत असत. आझमी कुटुंबीय आणि जावेद अख्तर यांच्यामध्ये चांगली मैफील रंगायची. शबाना देखील या सगळ्यात सहभागी व्हायच्या. याच काळात शबाना आणि जावेद अख्तर यांच्यामध्ये चांगली मैत्री झाली होती. त्यांच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर होऊ लागले होते.
वाचा: अन् हृतिकने मारली एक्स वाइफला मिठी, सर्वजण बसले पाहात
शबाना आझमी, जावेद अख्तर यांच्या काव्यात्मक शैलीच्या प्रेमात पडल्या होत्या. परंतु, त्यांच्या प्रेमाचा हा प्रवास फारसा सोपा नव्हता. त्यावेळी जावेद यांचे आधीच लग्न झाले होते, त्यामुळे त्यांच्या प्रेमकथेत अनेक चढ-उतार आले. जेव्हा कैफी आझमी यांना दोघांच्या प्रेमाबद्दल कळले, तेव्हा ते खूप संतापला होते. जावेद यांचे केवळ लग्नच झाले नव्हते, त्यांना दोन मुलेही होती. अशावेळी आपल्या मुलीने कोणाचा संसार मोडू नये असे जावेद अख्तर यांना वाटत होते.
जावेद अख्तर यांच्या पहिल्या पत्नीचे नाव हनी इराणी होते. हनी इराणीला या नात्याबद्दल समजल्यानंतर घरात रोज भांडणे होत होती. जावेद आणि हनी यांना फरहान अख्तर आणि झोया अख्तर ही दोन मुलेही होती. पण, जेव्हा हनीला वाटले की, या नात्यात काहीच उरले नाही आणि भांडणे दिवसेंदिवस वाढत आहेत, तेव्हा त्यांनी जावेद अख्तर यांना दुसऱ्या लग्न करण्याची परवानगी दिली. यानंतर हनी यांनी लग्नाच्या सात वर्षानंतर जावेद अख्तर यांना घटस्फोट दिला. यानंतर शबाना आझमी यांनी १९८४मध्ये १० वर्षांनी मोठ्या असलेल्या जावेद अख्तर यांच्यासोबत लग्न केले.