मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  एखाद्या फिल्मी कथेसारखीच आहे राम चरण आणि उपसनाची लव्हस्टोरी; भांडता भांडता प्रेमात पडले अन्...

एखाद्या फिल्मी कथेसारखीच आहे राम चरण आणि उपसनाची लव्हस्टोरी; भांडता भांडता प्रेमात पडले अन्...

Harshada Bhirvandekar HT Marathi
Mar 27, 2024 07:27 AM IST

राम चरणची लव्ह स्टोरी ही करण जोहरच्या एखाद्या रोमँटिक चित्रपटासारखीच आहे. त्याच्या लग्नाला आता ११ वर्षे पूर्ण झाली आहेत.

एखाद्या फिल्मी कथेसारखीच आहे राम चरण आणि उपसनाची लव्हस्टोरी; भांडता भांडता प्रेमात पडले अन्...
एखाद्या फिल्मी कथेसारखीच आहे राम चरण आणि उपसनाची लव्हस्टोरी; भांडता भांडता प्रेमात पडले अन्...

साऊथचा सुपरस्टार अभिनेता राम चरणला आता केवळ बॉलिवूडच नाही, तर हॉलिवूडमध्येही लोकप्रियता मिळत आहे. ‘आरआरआर’च्या'नाटू नाटू' या गाण्याने ऑस्कर जिंकल्यानंतर राम चरण जगभरात सुपरस्टार बनला आहे. अनेक संघर्षांनंतर या स्थानावर पोहोचलेले राम चरण आज (२७ मार्च) ३९वा वाढदिवस साजरा करत आहे. राम चरण याचा जन्म२७ मार्च१९८५ रोजी चेन्नई येथे झाला. फिल्मी पार्श्वभूमी असणाऱ्या राम चरण याला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून त्याने देखील मनोरंजन विश्वातच एन्ट्री घेतली होती. अभिनयासोबतच राम चरण त्याच्या लव्ह लाईफमुळे देखील चर्चेत असतो. राम चरण याच्या लग्नाला आता ११ वर्षे पूर्ण झाली आहेत.

राम चरणची लव्ह स्टोरी ही करण जोहरच्या एखाद्या रोमँटिक चित्रपटासारखीच आहे. राम चरण याच्या पत्नीचे नाव उपासना आहे. काही महिन्यांपूर्वीच दोघांनीही लग्नाच्या तब्बल१० वर्षानंतर आपल्या पहिल्या बाळाचे स्वागत केले. या दोघांची प्रेमकहाणी त्यांच्या कॉलेजच्या दिवसांपासून सुरू झाली होती. राम चरण पहिल्याच नजरेत उपसनाच्या प्रेमात पडला होता. सुरुवातीला दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि हळूहळू ते प्रेमात पडले. विशेष म्हणजे राम चरणचे आपल्यावर प्रेम आहे, हे उपासनाला बरेच दिवस माहित नव्हते.

ठरलं तर मग : बाप मागणार लेकाची माफी! सायलीच्या चतुराईमुळे सुभेदारांच्या घरात आनंदाचं वातावरण

कॉलेजमध्ये व्हायची भांडणं

कॉलेजच्या दिवसांमध्ये राम चरण आणि उपासना यांच्यात खूप भांडण आणि वाद व्हायचे. अर्थात त्यांची ही भांडणं अगदी जवळच्या मित्रांमध्ये असतात, तशीच होती. दोघेही कॅन्टीनमध्ये मस्करी करत एकमेकांवर सॉस फेकायचे. मात्र, त्यांच्या भांडणाचे प्रेमात रूपांतर कधी झाले हे दोघांनाही कळले नाही. एक दिवशी राम चरणला काही कारणास्तव परदेशात जावे लागले आणि दोघेही बराच काळ एकमेकांपासून दूर राहिले. यानंतर दोघेही एकमेकांना किती मिस करतात याची जाणीव त्यांना झाली. यादरम्यान उपासनालाही समजले की, तिचे राम चरणवर प्रेम आहे.

Viral Video: पोरीने नशीब काढलं! माधुरी दीक्षितच्या नवऱ्याने बनवल्या पुरणपोळ्या! व्हिडीओ होतोय व्हायरल

परदेशातून येताच केले प्रपोज

परदेशातून परत येताच राम चरणने उपासनाला प्रपोज केले आणि दोघांनी डेट करायला सुरुवात केली. दोघांचे कुटुंबीय एकमेकांना चांगले ओळखत असल्याने त्यांच्या लग्नात कोणतेही अडथळे आले नाहीत.२०११मध्ये साखरपुडा केल्यानंतर राम चरण आणि उपासना यांनी२०१२मध्ये लग्न केले. त्यांचे प्रेम आजच्या लव्हबर्ड्ससाठी एक उत्तम उदाहरण आहे. कारण अनेक अडचणी येऊनही राम चरण आणि उपासना यांनी एकमेकांची साथ सोडली नाही. लग्नाच्या१०वर्षांनंतर आणि बऱ्याच प्रयत्नांनंतर ही जोडी आई-बाबा झाली आहे. आजही दोघे एकमेकांची काळजी घेताना दिसतात.

IPL_Entry_Point