मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Raj Babbar Birthday: स्मिता पाटील यांच्या मृत्यूनंतर राज बब्बर 'या' अभिनेत्रीला करत होते डेट

Raj Babbar Birthday: स्मिता पाटील यांच्या मृत्यूनंतर राज बब्बर 'या' अभिनेत्रीला करत होते डेट

Aarti Vilas Borade HT Marathi
Jun 23, 2024 08:43 AM IST

Raj Babbar Birthday: एक दिवस या अभिनेत्रीला राज बब्बर यांच्या घरातून रडत बाहेर पडताना पाहिले होते. तेव्हा त्यांच्या अफेअरच्या आणखी चर्चा रंगल्या होता.

राज बब्बर यांचा वाढदिवस (Facebook | Raj Babbar)
राज बब्बर यांचा वाढदिवस (Facebook | Raj Babbar) (HT_PRINT)

८०च्या दशकातील सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेता म्हणून राज बब्बर ओळखले जायचे. जवळपास त्या काळातील त्यांचा प्रत्येक चित्रपट हिट ठरला होता. राज यांनी अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली होती. राज जसे फिल्म इंडस्ट्रीमध्ये सक्रीय होते तसेच ते राजकारणातील देखील प्रसिद्ध चेहरा होता. एक यशस्वी राजकारणी म्हणूनही त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे. राज बब्बर यांच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र अनेक चढ-उतार आले आहेत. त्यांचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत राहिले आहे. आज २३ जून रोजी राज बब्बर यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्या खासगी आयुष्याविषयी...

ट्रेंडिंग न्यूज

राज बब्बर यांचे पहिले लग्न

राज बब्बर आणि स्मिता पाटील यांची प्रेमकथा देखील बॉलिवूडमध्ये बरीच गाजली. पहिले लग्न झाले असताना देखील राज बब्बर बॉलिवूड अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या प्रेमात पडले होते. ते स्मिता पाटील यांच्या प्रेमात इतके आकंठ बुडाले होते की, त्यांनी आपले कुटुंब आणि दोन मुले सोडून स्मिता पाटील यांच्याशी लग्न केले. पण त्यांचे हे प्रेमही फार काळ टिकले नाही. लग्नाच्या काही काळाने स्मिता पाटील या देखील राज बब्बर यांच्यापासून कायमच्या दुरावल्या. मुलगा प्रतीक बब्बरला जन्म दिल्यानंतर स्मिता यांचा मृत्यू झाला. एकीकडे मुलगा जन्माला आल्याचा आनंद होताच, पण दुसरीकडे प्रेम गमावल्याचे दु:ख त्यांना सहन होत नव्हते.
वाचा: 'रेखाकडे असे काय आहे जे माझ्याकडे नाही', शबाना आझमी यांनी दिग्दर्शकाला विचारला होता प्रश्न

राज बब्बरने केले दुसऱ्या अभिनेत्रीला डेट

स्मिता यांच्या निधनानंतर राज बब्बर पूर्णपणे खचून गेले होते. त्याच दरम्यान त्यांच्या आयुष्यात रेखाची एंट्री झाली. स्मिता पाटील यांच्या जाण्यामुळे खचलेल्या राज बब्बर यांना रेखाने आधार दिला. एका मुलाखतीत राज बब्बर यांनी रेखासोबतच्या नात्याबद्दल सांगितले होते. मात्र, रेखाने नेहमीच या नात्याच्या वृत्ताला नकार दिला होता. मात्र, दोघांची जवळीक इतकी वाढली होती की, बॉलिवूडच्या कॉरिडॉरमध्ये याची कुजबुज होऊ लागली.
वाचा: पाच जन्मातील बायका एकाच जन्मात! स्वप्नील जोशीच्या 'बाई गं'चा टीझर चर्चेत

रेखा आण राज यांच्यात वाढली जवळीक

रेखा आणि राज बब्बर यांच्या मैत्रीचे हळूहळू प्रेमात रुपांतर होत होते. रेखा यांना राज बब्बर यांच्याशी लग्न करायचे होते. पण राज यांना ते मान्य नव्हते. राज बब्बर त्यांची पहिली पत्नी नादिराकडे परत जाणार होते. एकदा राज यांनी रेखाला याबात सांगितले. त्यानंतर राज बब्बर आणि रेखा यांच्यामध्ये जोरदार भांडणे झाले. दरम्यान, रेखा या रागाच्या भरात राज बब्बर यांच्या जुहू येथील बंगल्यातून अनवाणीच बाहेर पडल्या होत्या. अनेकांनी त्यांना अनवाणी आणि रडत फिरताना पाहिले होते. मात्र जेव्हा विचारण्यात आले तेव्हा या सर्व अफवा असल्याचे रेखा यांनी म्हटले होते.
वाचा: ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मधील कलाकाराचा १६ वर्षांनी मालिकेला रामराम, चाहत्याची पोस्ट

राज बब्बर यांना मिळाली होती धमकी

रेखा आणि राज बब्बर यांच्या अफेअरच्या बातम्या व्हायरल होऊ लागल्यावर चित्रपट निर्माते हबीब नाडियादवाला यांनी राज बब्बर यांना रेखापासून दूर राहण्यासाठी धमकी दिली. तेव्हापासून ते रेखापासून दूर झाले. मात्र, यावर बोलताना राज बब्बर यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की, ‘धमकी हा शब्द मी वापरणार नाही. पण, मला धमकावण्याची क्षमता हबीब नाडियादवालामध्ये होती. आमच्या नात्यामुळे वाद निर्माण झाले होते.’

WhatsApp channel